मुंबई- लेह येथे पूल निर्मितीच्या कामावेळी दरीत कोसळून वीरमरण आलेले जवान सचिन मोरे यांच्यावर आज मुळगावी होणार अंत्यसंस्कार... नाशकातील सिडको परिसरात नवविवाहितेची आत्महत्या.. या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा नोंद केला आहे.. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह टीका केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांना एका राष्ट्रवादीच्याच नगरसेवकाने समर्थन दिले आहे... रत्नागिरीत माजी खासदार निलेश राणे मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.. या सारख्या राज्य आणि देशातील सकाळी ९ वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा...
मुंबई - पुणे- लेह येथे पूल उभारण्याच्या कामादरम्यान दरीत कोसळून वीरमरण पावलेले लष्कराच्या 115 इंजिनिअर्सच्या तुकडीतील नाईक सचिन मोरे यांचे पार्थिव शुक्रवारी (दि. 26 जून) सायंकाळी पुणे विमानतळावर खासगी विमानाने आणण्यात आले. यावेळी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे आणि हवाई दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांचे पार्थिव पुण्यातून लष्करी वाहनाने त्यांच्या मालेगाव तालुक्यातील मूळगावी येथे नेण्यात आले. त्या ठिकाणी लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
वाचा सविस्तर -पुणे विमानतळावर हुतात्मा सचिन मोरे यांना लष्कराकडून मानवंदना; आज मुळगावी होणार अंत्यसंस्कार
नाशिक -सिडको परिसरातील पाटील नगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
वाचा सविस्तर -मरण कोणाला आवडतं? पण, मला आता जगायचं नाही म्हणत विवाहितेची आत्महत्या
नागपूर - मोठ्या बहिणीने मोबाईल दिला नाही या रागातून १४ वर्षीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शहरातील जरीपटका परिसरात घडली आहे. नयन मगनाणी असे मृताचे नाव आहे. तो नवव्या वर्गात शिकत होता.
वाचा सविस्तर -धक्कादायक...! बहिणीने मोबाईल दिला नाही म्हणून भावाची आत्महत्या
रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या संथ गतीने सुरू असलेल्या आणि नागरिकांचा विरोध डावलून ठेकेदारांकडून काम सुरू असलेल्या ठिकाणांची पाहणी माजी खासदार निलेश राणे यांनी शुक्रवारी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा आणि राजापूर या दोन तालुक्यातील कामांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी कामातील त्रृटी लक्षात घेत त्यांनी ठेकेदारांची कानउघडणी केली.
वाचा सविस्तर -मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून निलेश राणेंनी अधिकाऱ्यांना झापलं, तर ठेकेदारांना धरलं धारेवर
हैदराबाद -कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. देशभरात शुक्रवारी सर्वाधिक 17 हजार 296 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 407 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 90 हजार 401 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 15 हजार 301 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.