महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात २ हजार ७७९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ; ५० रुग्णांचा मृत्यू

आज राज्यात २,७७९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा २०,०३,६५७ वर पोहचला आहे. राज्यात आज ५० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

corona
corona

By

Published : Jan 22, 2021, 9:03 PM IST

मुंबई -आज राज्यात २,७७९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा २०,०३,६५७ वर पोहचला आहे. राज्यात आज ५० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ५०,६३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ४४,९२६ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१७ टक्के -

राज्यात आज ३,४१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १९,०६,८२७ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४०,८०,९३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,०३,६५७ नमुने म्हणजेच १४.२३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,१३,४१४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण ४४,९२६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

राज्यात १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, १८ जानेवारीला १,९२४ सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा -ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष; तीन पक्षांना मिळून यश मिळवता आलं नाही - फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details