मुंबई - सर्वच राजकीय पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आज ३५ जणांची जाहीरनामा समिती जाहीर केली. या समितीच्या अध्यक्षपदी खासदार वंदना चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज या समितीची घोषणा केली.
राष्ट्रवादीची जाहीरनामा समिती जाहीर, खासदार वंदना चव्हाण यांची अध्यक्षपदी नियुक्ती - sanjiv naik
सर्वच राजकीय पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आज ३५ जणांची जाहीरनामा समिती जाहीर केली.
'या' सदस्यांचा समितीमध्ये समावेश
माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार राजेश टोपे, अनिल देशमुख, आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी खासदार संजीव नाईक, माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार आनंद परांजपे, श्रीमती उषाताई दराडे, आमदार विद्या चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार ख्वाजा बेग, जीवनराव गोरे, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार जयदेव गायकवाड, सारंग पाटील, सुरेश पाटील, शेखर निकम, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विजय कन्हेकर आदींचा समावेश समितीमध्ये करण्यात आला आहे. याशिवाय विशेष निमंत्रित म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, सुधीर भोंगळे, डॉ. मिलिंद आवाड, तर समन्वयक म्हणून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.