महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक - Mumbai railway news

विविध तांत्रिक कामांसाठी आज (रविवारी) रेल्वेच्या तीनही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक

By

Published : Aug 18, 2019, 8:05 AM IST

मुंबई - विविध तांत्रिक कामांसाठी आज (रविवारी) रेल्वेच्या तीनही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावणार असतील.

मध्य रेल्वेचा माटुंगा ते मुलुंड सकाळी साडेदहा0 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर रेल्वेच्या मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी 10 ते संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करण्याची मुभा असेल.

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान शनिवारी मध्यरात्री 1 ते रविवारी पहाटे 4.30 आणि रविवारी सकाळी 10.30 ते दुपारी 3.35 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details