मुंबई- दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केटजवळील भिंत कोसळली आहे. यात तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या भिंतीला लागून असलेल्या झोपडपट्टीत हे लोक रहात होते. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॅाक्टरांनी दिली.
आज सकाळपासूनच मुंबई आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. याचा परिणाम रेल्वे, रस्ते वाहतुकीवरदेखील झाला आहे.