महाराष्ट्र

maharashtra

मुंबई महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष; 100 हुन अधिक तरुणांना फसवणारी टोळी गजाआड

By

Published : Dec 19, 2020, 9:18 AM IST

मुंबई महापालिकेत नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून अनेक तरुणांची फसवणूक करत कोट्यवधीचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तीन जणांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे.

मुंबई महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष
मुंबई महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष

मुंबई- महानगरपालिका किंवा मुंबई शेजारच्या शहरांमधील पालिकेत नोकरी लावून देतो म्हणून 100 हून अधिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना करोडो रुपयांचा चुना लावणाऱ्या तीन आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असून दुसरा आरोपी हा मुंबई महानगरपालिकेचा सेवानिवृत्त कर्मचारी आहे. याबरोबरच तिसरी महिला आरोपी ही मुंबई पोलीस खात्यातील सेवानिवृत्त अंमलदार असल्याचे समोर आलेला आहे.

बनावट नियुक्ती पत्र देऊन करत होते फसवणूक-

मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कशाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुंबईत अशा प्रकारची टोळी सक्रिय असल्याचं समोर आले होत. त्यानंतर मालमत्ता कक्ष पोलिसांनी या संदर्भातील पीडित व्यक्तींना संपर्क साधून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन ही कारवाई केली आहे. आरोपींनी पीडितांचा विश्वास बसावा म्हणून मुंबई महानगरपालिकेचा बनावट नियुक्तीपत्र वैद्यकीय तपासणी केल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन प्रत्येकी तीन लाख पन्नास हजार रुपये घेतले होते. आतापर्यंत या आरोपींनी 100 अधिक तरुण-तरुणींना गाठून त्यांना महानगरपालिकेत नोकरी लावून देतो, असे आमिष देऊन प्रत्येकाकडून लाखो रुपये उकळले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details