मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने वानखेडे कुटुंबियांना धमकी मिळत आहेत. मुंबई एनसीबीचे माजी प्रमुख समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकी मिळाल्यानंतर माहिती दिली आहे.
डी कंपनीच्या नावाने धमक्यांमुळे वानखेडे यांच्या पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर तणावात आहेत. ही धमकी बनावट ट्विटर अकाउंटवरून देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या लहान मुलींनाही धमकी दिली आहे. धमक्यांनंतर समीर वानखेडे यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी विचारले आहे की, भविष्यात त्यांच्यावर किंवा तिच्या कुटुंबावर हल्ले झाले तर जबाबदार कोण? या धमक्या गांभीर्याने घेत समीर वानखेडे पोलिसात तक्रार करणार आहेत.
विदेशातील ट्विटर हँडलवरून धमक्याक्रांती रेडकर म्हणाल्या, आम्हाला धमक्या देणे, ट्रोल करणे खूप दिवसांपासून सुरू आहे. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करत आलो आहोत. आम्ही अशा लोकांना ब्लॉक करतो. मात्र दोन दिवसांपासून धमक्यांची वेगळ्या पद्धतीने मालिका सुरू झाली आहे. ज्या दोन ट्विटर हँडलवरून धमक्या येत आहेत. ते वेगळेच दिसत आहेत. ते भारतीय ट्विटर हँडल नसून विदेशातील ट्विटर हँडल आहेत. हे लोक भारताचा द्वेष करतात. ते लोक दाऊदचे नाव घेऊन आम्हाला धमक्या देत आहेत. आमच्या मुलांची नावे घेतात. देशाला शिव्या देत आहेत. धमक्या देणारे केंद्र सरकार आणि समीर वानखेडे यांना शिवीगाळ करत आहेत.