मुंबई :गेल्या काही दिवसांचा इतिहास पाहिला तर राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार वाढले आहेत. फोन, पत्रे, सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांना धमक्या देण्याचे प्रकार वाढत आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या तयारीत सर्वच राजकीय पक्षांचे नेते व्यग्र असताना अशा धमक्या आल्या असून राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजकीय नेत्यांना धमकावण्यासारखेच नाही का? याला जबाबदार कोण, असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
लोकशाहीसाठी हा खूप मोठा प्रश्न होत आहे. अशा प्रकाराला वेळीच आळा घातला गेला पाहिजे. येणाऱ्या काळात तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला देखील धमक्या देणाऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे. सरकारने गंभीरपणे विचार केला पाहिजे- राजकीय विश्लेषक विवेक भावसार
सरकारने गंभीर व्हावे :आपल्या देशामध्ये बाबरी मशीद पडण्यापूर्वी हिंदू आणि मुसलमानांमध्ये छोट्या प्रमाणात वादविवाद होत होते. 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने हिंदू विचारांचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर मात्र हिंदू आणि मुस्लिम समाजात मोठी दरी निर्माण झाली. समाजात ते निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे सोशल मीडिया.सोशल मीडिया हा एक भला मोठा राक्षस निर्माण झाला आहे. तरुण पिढी सोशल मीडियाचा वापर करत आहे. त्यांना खरे आणि खोटे काय याची जाण नसते. त्यामुळे अनेक गोष्टींच्या आहारी जाऊन मला द्वेष निर्माण होतो. यातून धमकी देण्याचे प्रकार वाढले असावे असे मला वाटते, असे भावसार म्हणाले. या धमकी प्रकरणातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सुटले नाहीत. धमकी देणार हा मानसिक विकृत असतो. मानसिक संतुलन बिघडल्याने अशा प्रकार घडल्याची कबुली अनेक धमकी देणाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे. खरेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले की ब्रेनवॉश केले गेले याचा देखील तपास होणे गरजेचा आहे. समाजासमजातील द्वेष पसरवला जात आहे. हा द्वेष मुख्य किड आहे.