महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुड न्यूज..! यंदा दुष्काळाचे संकट नाही.. सरासरी ९६ टक्के पावसाचा अंदाज

वाढत्या उन्हाळ्यामुळे जिवाची काहिली होत असतानाच भारतीय हवामान खात्याने आज शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

गुड न्यूज..! यंदा दुष्काळाचे संकट नाही.. सरासरी 96 टक्के पावसाचा अंदाज

By

Published : Apr 16, 2019, 9:52 AM IST

मुंबई - देशात यावर्षी सरासरीच्या (लाँग पिरिअड अ‍ॅव्हरेज) ९६ टक्के (४ टक्के कमी) पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या अंदाजात ५ टक्के अधिक किंवा कमी असा फरक पडू शकतो, असे नमूद करण्यात आले आहे.

गुड न्यूज..! यंदा दुष्काळाचे संकट नाही.. सरासरी 96 टक्के पावसाचा अंदाज

वाढत्या उन्हाळ्यामुळे जिवाची काहिली होत असतानाच भारतीय हवामान खात्याने आज शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

मान्सूनचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याने तो नेमका कसा असेल, याविषयी सर्व क्षेत्रात उत्सुकता असते़. दरम्यान, सध्या निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगीनंतर सोमवारी दुपारी मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीएवढाच पाऊस पडेल. यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव असला तरी नंतर तो क्षीण होईल. हंगामाच्या अखेरीपर्यंत मान्सून आपली सरासरी गाठेल, एकूण सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details