महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिवे न लावण्याबाबत 'हा' मॅसेज होतोय व्हायरल... - लाॅकडाऊन बातमी

मोदींच्या थाळी, टाळ्या या आवाहनाला अनेकांनी पाठिंबा दिला होता. त्यावेळी झालेला गोंधळ पाहता हा प्रयोग फसल्याचे चित्र देशात पाहायला मिळाले होते. यामुळे मोदी यांच्या दुसऱ्या आवाहनाला सर्वसामान्यदेखील विरोध करताना दिसत आहेत.

this-message-is-going-viral-about-modi-appeal-to-people
this-message-is-going-viral-about-modi-appeal-to-people

By

Published : Apr 5, 2020, 6:34 PM IST

मुंबई- देशात लॉकडाऊन लागू असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आज (रविवारी) रात्री नऊ वाजता घरातील विजेवर चालणार प्रकाशदिवे बंद करुन मेणबत्ती दिवे, मोबाईलची टॉर्च किंवा फ्लॅश लावण्याचे आवाहन केले आहे. यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होताना दिसत आहे. मी विज्ञानवादी, मी विवेकवादी रविवारी लाईट बंद करणार नाही, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा-#Corona: कल्याण-डोंबिवलीत आणखी तीन रुग्ण; सहा महिन्यांचे बाळही 'पॉझिटिव्ह'

मोदींच्या थाळी, टाळ्या या आवाहनाला अनेकांनी पाठिंबा दिला होता. त्यावेळी झालेला गोंधळ पाहता हा प्रयोग फसल्याचे चित्र देशात पाहायला मिळाले होते. यामुळे मोदी यांच्या दुसऱ्या आवाहनाला सर्वसामान्यदेखील विरोध करताना दिसत आहेत.

देशातील सर्व १३० कोटी भारतीयांनी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाईट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्यास मोदींनी सांगितले. या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध: कार दूर करू, असेही मोदी म्हटले होते. मात्र, हे आवाहन लोकांना जास्त रुचले नसल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर याचा मोठा विरोध पहायला मिळत आहे. मी विज्ञानवादी, मी विवेकवादी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता लाईट्स बंद करणार नाही, दिवे लावणार नाही, माझा विज्ञानावर, डॉक्टरांवर पूर्ण विश्वास आहे. मी विज्ञानवादी भारतीय, असे मॅसेज व्हायरल होत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details