मुंबई - उत्तर-मध्य मुंबई एकीकडे प्रिया दत्त, पूनम महाजन असे मातब्बर नेते असताना त्यांच्याविरूद्ध लढा देण्यासाठी तृतीयपंथी उमेदवार स्नेहा काळे यांनी सोमवारी उमेदवारी दाखल केला आहे. दुर्बल घटक आघाडी पक्षाच्या वतीने त्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तृतीयपंथीसाठी आजपर्यत कोणीच काही केलं नाही म्हणून मी निवडणुकीत उरतरण्याचा निर्णय घेतल्याचे काळे यांनी सांगितले.
उत्तर-मध्य मुंबईतून 'या' उमेदवाराच्या प्रचारासाठी उतरणार तृतीयपंथीयांची फौज..
काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि भाजपच्या पूनम महाजन यांच्यात मुख्य लढत होणार आहे. पण दुसरीकडे तृतीयपंथीयांची फौज प्रचाराला उतरणार असल्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
या मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि भाजपच्या पूनम महाजन यांच्यात मुख्य लढत होणार आहे. पण दुसरीकडे तृतीयपंथीयांची फौज प्रचाराला उतरणार असल्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत. काळे यांचे शिक्षण बी. कॉमपर्यंत झाले आहे.
तृतीयपंथी असल्यामुळे मोठ्या नोकरीची संधी मिळत नाही. समाजाकडून चांगली वागणूक नाही, रुग्णालयात उपचार मिळत नाहीत, पोलिसांकडून होणारा त्रास व काही लोकांकडून होणारा लैंगिक छळ याचा अनेक तृतीयपंथींना त्रास होतो. तृतीयपंथीयांनाही सन्मानाने जगण्याची संधी मिळण्यासाठी त्यांचा आवाज संसदेपर्यंत पोहचवण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असे स्नेहा काळे यांनी सांगितले. आतापर्यत कोणत्याच सरकारने आम्हाला संधी दिली नाही, आमच्याकडे लक्ष दिले नाही. किती दिवस आम्ही असे वणवण फिरायचे, निवडणुकीसाठी निधीही जमा करणार आहे. समाजातील वंचित घटक, दुर्बल घटक, शेतकरी, सैनिक, शहीदांच्या विधवा, वेश्या आणि तृतीयपथीयांना न्याय देणे हा माझा प्रयत्न असेल, असेही काळे यांनी सांगितले.