मुंबई - मुंबईत १४ मार्चला सीएसएमटीजवळील पादचारी पूल कोसळला होता. या अपघातात ६ जणांचा मृत्यू तर ३१ जण जखमी झाले होते. याप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या आणखी एक कार्यकारी अभियंता अनिल पाटील यास पोलिसांनी अटक केली आहे. यापुर्वी लेखापरीक्षक नितीनकुमार देसाई याच्यासह सहाय्यक अभियंता एस एफ कुलकुलते या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.
सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनाप्रकरणी तिसरा आरोपी अटकेत - mahapalika
अनिल पाटील हा अभियंता मुंबई महानगर पालिकेच्या पूल विभागात कार्यरत होता. दरवर्षी पूलांचे एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये तपासणी होणे बंधनकारक आहे, मात्र पूल विभागातील आरोपी अभियंत्यांनी परिक्षण न केल्याचे तपासात उघड झाले आहे.
अनिल पाटील हा अभियंता मुंबई महानगर पालिकेच्या पूल विभागात कार्यरत होता. दरवर्षी पूलांचे एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये तपासणी होणे बंधनकारक आहे, मात्र पूल विभागातील आरोपी अभियंत्यांनी परिक्षण न केल्याचे तपासात उघड झाले आहे. पूलाची देखरेख करणे, स्ट्रक्चरल ऑडिटवर लक्ष ठेवणे, ऑडिट होत असताना उपस्थित रहाणे गरजेचे होते मात्र आरोपी अभियंत्यांनी काही न केल्याचे सिद्ध झाले आहे. अनिल पाटील सप्टेंबर २०१४ ते डिसेंबर २०१८ पर्यंत कामावर होते तर एस एफ काळकुटे हे २००८ पासून ब्रिज विभागात आहेत कार्यरत आहेत.
सीएसएमटी ब्रीज १४ मार्चला पडला होता. या घटनेत ६ जणांचा मृत्यू तर ३१ जण जखमी झाले होते. पोलीस चौकशीत या गुन्ह्यात ३०४/२ कल्पेबाल होमिसईड हा गुन्हा नोंद नव्याने जोडण्यात आला आहे. या प्रकरणी, या पुलाचे ऑडिट करणाऱ्या नीरज कुमार देसाई या स्टक्चरल ऑडीटरला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आझाद मैदान पोलीस पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना आतापर्यंत अटक केली आहे. यात मुंबई महानगर पालिकेच्या २ अभियंत्यांचा समावेश आहे. मुंबई महानगर पालिकेचा सहायक अभियंता कुलकुलते व अनिल पाटील यांना पुलाचे मिळालेल्या ऑडिट रिपोर्टचे निरीक्षण करण्याची जबाबदारी होती. मात्र निष्काळजीपणा बाळगल्याचे पोलीस तपासत निष्पन्न झाल्याने पोलिसांनी अटक केली आहे.