मुंबई- शहरातील बीपीसीएल ऑईल कंपनीच्या रिफायनरीमधून ऑईल टँकरच्या साहय्याने परदेशात ऑईल निर्यात केले जाते. या ऑइल टँकरमधील फर्नेस पेट्रोल काढून त्यामध्ये पाणी भरणाऱ्या टोळीचा छडा मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट ९ ने लावला. याप्रकरणी ३ टँकर चालकांना अटक करण्यात आली असून भेसळ करण्यात आलेल्या तीनही टँकरांना हस्तगत करण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बीपीसीएल रिफायनरीमधून रिफाईंड करण्यात आलेल्या पेट्रोल टँकरद्वारे जेएनपिटी बंदरात पाठवून परदेशात पाठवले जात होते. मात्र काही महिन्यांपासून बीपीसीएलचे काही टँकर जेएनपिटी येथून परत पाठविण्यात आले होते. परत पाठविण्यात आलेल्या टँकरमधील फर्नेस नावाचे पेट्रोल काढून ऑइल टँकरमध्ये चक्क पाणी मिसळले जात असल्याची तक्रार बीपीसीएलच्या अधिकार्यांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच ९ कडे तक्रार दाखल करण्यात आली होती.