मुंबई - राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी 21 ऑक्टोबरला मतदान तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. गेल्या 18 सप्टेंबरला निवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली. त्यासाठी शुक्रवारी उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आज (गुरुवारी) विविध पक्षातील दिग्गज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
हेही वाचा -भाजपमध्ये बंडखोरी? यादीत नाव नसतानाही एकनाथ खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल
यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण येथून तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासोबतच पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर हे जालना जिल्ह्यातील परतूर येथून तर आमदार राजेश टोपे हे घनसावंगी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासोबतच अजूनही काही दिग्गज आज (गुरुवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते पुढीलप्रमाणे -
नाव मतदारसंघ
आदित्य ठाकरे (शिवसेना) वरळी मुंबई
हरिभाऊ बागडे (विधानसभा अध्यक्ष) औरंगाबाद-फुलंब्री
चंद्रकांत पाटील (महसूलमंत्री) कोथरूड, पुणे
पंकजा मुंडे (ग्रामविकास मंत्री) परळी, बीड
धनंजय मुंडे (राकाँ) परळी, बीड
गिरीश महाजन (जलसंपदामंत्री) जामनेर, जळगाव
गुलाबराव पाटील (सहकार राज्यमंत्री) जळगाव-ग्रामीण
जयकुमार रावल (पर्यटन मंत्री) शिंदखेडा, धुळे
डॉ. अनिल बोंडे (कृषीमंत्री) मोर्शी, अमरावती
अतुल सावे (राज्यमंत्री) औरंगाबाद-मध्य
जितेंद्र आव्हाड (राकाँ) कळवा-मुंब्रा, ठाणे
संजय केळकर (भाजप) ठाणे शहर
जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) बीड
भास्कर जाधव (शिवसेना) गुहागर, रत्नागिरी
अमित देशमुख (काँग्रेस) लातूर-शहर
धीरज देशमुख (काँग्रेस) लातूर-ग्रामीण
संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) निलंगा, लातूर
रोहित पवार (अहमदनगर) कर्जत-जामखेड
संग्राम जगताप (राकाँ) अहमदनगर
अनिल राठोड (शिवसेना) अहमदनगर
दिलीप वळसे-पाटील (माजी विधानसभा अध्यक्ष) आंबेगाव, पुणे
डॉ. सुनील देशमुख (भाजप) अमरावती
प्रिती बंड (शिवसेना) बडनेरा, अमरावती
यशोमती ठाकूर (काँग्रेस) तिवसा, अमरावती
संभाजी पाटील-निलंगेकर (भाजप) निलंगा, लातूर
बसवराज पाटील (काँग्रेस) औसा, लातूर
अतुल भोसले (पंढरपूर देवस्थान समिती अध्यक्ष) कराड, सातारा
जयकुमार गोरे माण-खटाव, सातारा
योगेश कदम (शिवसेना) दापोली मतदारसंघ ((पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव)
नितीन राऊत (काँग्रेस) (उत्तर-नागपूर)
विकास ठाकरे (काँग्रेस) (पूर्व-नागपूर)