मुंबई - मुंबईतील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या धारावी झोपडपट्टीला कोरोनामुक्त करण्याचा दृढनिश्चय मुंबई महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने केला आहे. त्यासाठी विशेष आराखड्याअंतर्गत रहिवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. आतापर्यंत डॉक्टर घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करत होते. पण, आता मात्र हे स्क्रिनिंग धारावीतील किमान 100 खासगी क्लिनिकमध्ये होणार आहे. त्यानुसार एक-दोन दिवसांत धारावीतील खासगी क्लिनिक सुरू होतील, अशी माहिती महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले दिले आहेत.
धारावीत आता खासगी क्लिनिकमध्ये थर्मल स्क्रिनिंग, डॉक्टरांना पीपीई किटही पुरवणार
धारावीतील कोरोनाचा कहर रोखण्यासाठी घरोघरी जाऊन थर्मल स्क्रिनिंग करत संशयित आणि कोरोनाबाधित रुग्ण शोधून काढत संसर्ग कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुकुंदनगर, मुस्लीमनगर, बलिगानगर, सोशलनगर आणि अन्य एका ठिकाणी अशा 5 हॉटस्पॉटमध्ये 10 एप्रिल ते 17 एप्रिलदरम्यान थर्मल स्क्रिनिंग केले. 40 हजार रहिवाशांचे स्क्रिनिंग पूर्ण करत 83 पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढले.
धारावीतील कोरोनाचा कहर रोखण्यासाठी घरोघरी जाऊन थर्मल स्क्रिनिंग करत संशयित आणि कोरोनाबाधित रुग्ण शोधून काढत संसर्ग कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुकुंदनगर, मुस्लीमनगर, बलिगानगर, सोशलनगर आणि अन्य एका ठिकाणी अशा 5 हॉटस्पॉटमध्ये 10 एप्रिल ते 17 एप्रिलदरम्यान थर्मल स्क्रिनिंग केले. 40 हजार रहिवाशांचे स्क्रिनिंग पूर्ण करत 83 पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढले. हजारोना क्वारंटाइन केले. हे 5 हॉटस्पॉट झाल्यानंतर कोळीवाडा आणि इतर हॉटस्पॉटकडे मोर्चा वळवण्यात येणार होता. मात्र, आता आयएमएने डोअर टू डोअर थर्मल स्क्रिनिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
धारावीच्या गल्ल्या अत्यंत लहान, निमुळत्या असून पीपीई किट घालून 6 ते 7 तास गल्ल्यांमध्ये फिरणे डॉक्टरांसाठी धोक्याचे ठरत आहे. यामुळे डॉक्टरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिच बाब लक्षात घेता डोअर टू डोअर स्क्रिनिंग बंद करत आता खासगी क्लिनिकमध्ये स्क्रिनिंग करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. उत्तुरे यांनी सांगितले आहे. धारावी किमान 300 खासगी क्लिनिक आहेत. त्यानुसार डॉक्टरांना आवाहन करत क्लिनिक सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे. या डॉक्टरांना पीपीई किट देण्यात येणार असून इतरही आवश्यक गोष्टी पालिका पुरवणार आहे. तर ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वेगळे, तर इतर रुग्ण वेगळे तपासले जाणार आहेत. यातून संशयित आणि कोरोनाग्रस्त रुग्ण शोधून काढण्यात येणार आहेत. त्यानुसार डॉक्टरांची यादी तयार केली जात असून किमान 100 तरी क्लिनिक सुरू होतील, असेही डॉ. उत्तुरे यांनी सांगितले आहे.