महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vanchit Bahujan Aghadi : महाविकास आघाडीत वंचितच्या एन्ट्री बाबत अद्यापही सस्पेन्स - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा झाली. मात्र अद्यापही महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना स्थान द्यायचे की, नाही याबाबत निश्चिती झालेली नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीच्या प्रवेशासाठी उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची मनधरणी करावी लागणार आहे.

Vanchit Bahujan Aghadi
महाविकास आघाडीत वंचितच्या एन्ट्री बाबत अद्यापही सस्पेन्स

By

Published : Jan 25, 2023, 5:56 PM IST

महाविकास आघाडीत वंचितच्या एन्ट्री बाबत अद्यापही सस्पेन्स

मुंबई :वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी येऊन जाहीर केली. तसेच ही युती जाहीर करत असताना महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समाविष्ट करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचा अद्याप तरी नकार नाही. याबाबतची त्यांच्यासोबत चर्चा करताना कोणीही वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊ नये. अशा प्रकारचे वक्तव्य केले नसल्याचं स्वतः उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होते. मात्र, तसे असले तरी अद्यापही वंचित बहुजन आघाडी अधिकृतरित्या महाविकास आघाडीमध्ये सामील झालेली नाही. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये कशाप्रकारे समाविष्ट करून घ्यायचे याबाबतच्या चर्चा केल्या जाणार आहेत.


मविआ प्रवेशाबाबत चर्चा करणार :वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती जाहीर झाली असून याबाबत अद्याप केवळ उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांसोबतच चर्चा झालेली आहे. महाविकास आघाडी समाविष्ट करण्याबाबत वंचित बहुजन आघाडी सोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच यापुढेही थेट राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यासोबत वंचित बहुजन पक्षाची चर्चा होणार नाही. याबाबत सर्वस्वी अधिकार उद्धव ठाकरे यांना आहेत.

मविआचा वंबआ घडक पक्ष नाही :त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाचा प्रवेश करायचा किंवा नाही याबाबत उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाची येणाऱ्या काळात चर्चा करतील. मात्र सध्याच्या परिस्थितीत केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित बहुजन आघाडी वंचित युती झालेली आहे. त्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी पक्ष नाही, असे स्पष्टीकरण पक्षाचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकल यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना दिल आहे.


वंचित बाबत राष्ट्रवादीशी चर्चा -वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांची आघाडी झाल्यानंतर काल उशिरा रात्री ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील पोटनिवडणूक आणि होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. मात्र यासोबतच वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये कशाप्रकारे समाविष्ट करता येईल याबाबत देखील उद्धव ठाकरे, अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली असलांची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

मविआत मित्र पक्षासाठी फॉर्मुला -महाविकास आघाडी म्हणून होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून लग्नाची तयारी तिन्ही पक्षाने केलेली आहे. मात्र या निवडणुकांमध्ये समविचारी पक्ष सोबत आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस, ठाकरे गट ज्या मित्र पक्षाला सोबत घेऊन येईल त्या पक्षाला आघाडीत आणणाऱ्या मोठ्या पक्षाच्या जागांमधून जागा दिल्या जाणार असल्याची प्राथमिक बोलणी तिन्ही पक्षांमध्ये झालेली आहे.

वंचितला जागा मिळणार? राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील जो पक्ष मित्र पक्षाला घेऊन महाविकास आघाडीमध्ये येईल तो निवडणुकांमध्ये आपल्या जागांमधून त्या मित्र पक्षाला जागा देऊ असे स्पष्ट केले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्षाला विधानसभा किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ज्या जागा निवडणूक लढवण्यासाठी द्यावा लागणार आहेत. त्या थेट ठाकरे गटातून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे याच फॉर्मुलानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी कामगार पक्ष किंवा समाजवादी पक्षाला महाविकास आघाडी निवडणुकांमध्ये समाविष्ट करून घेणार असेल तर राष्ट्रवादीच्या कोठ्यात आलेल्या जागेतून त्यांना जागा द्यावा लागणार. तर, तिथेच काँग्रेस पक्ष ज्या मित्र पक्षांना महाविकास आघाडीमध्ये अनिल त्यांना आपल्या कोट्याच्या जाग्यामधून मित्र पक्षाला जागा द्यावा लागणार आहेत.

हेही वाचा -Sanjeev Palande Granted Bail : अनिल देशमुख यांचे खासगी स्वीय सहायक संजीव पलांडे यांना जामीन मंजूर

ABOUT THE AUTHOR

...view details