महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईच्या लोकलमध्ये आगीपासून संरक्षण व्यवस्था नाही; माहिती अधिकारात उघड झाली बाब - 75 ते 80 लाख प्रवासी

Fire protection system in Mumbai local : 75 ते 80 लाख प्रवासी मुंबई लोकल मधून रोज प्रवास करतात. मुंबई लोकलमध्ये सुरक्षा प्रतिबंधात्मक व्यवस्था नसल्याची धक्कादायक बाब, माहिती अधिकारात उघड झालेली आहे. तर लोकल स्टेशनचं अंतर कमी असल्यामुळं प्रथमदर्शनी आपत्तीवर नियंत्रण मिळवण्यात रेल्वे स्थानकाकडून मदत होते, असं मध्य रेल्वेच्या प्रशासनाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शिवराज मानसपुरे यांनी म्हटलय.

Mumbai local
मुंबई लोकल

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 4:14 PM IST

मुंबई लोकल आगीची समस्या

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय लोकलमधून रोज 75 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या तीनही मार्गांवर धावणाऱ्या रेल्वेमध्ये कोणतीही आटोमॅटिक अग्नी सुरक्षा प्रतिबंधात्मक व्यवस्था नसल्याची धक्कादायक बाब, माहिती अधिकारात उघड झालेली आहे. तर मुंबईच्या रेल्वे विभागाचा दावा आहे की 'लोकल प्रत्येक स्टेशनवर दर दोन मिनिटांनी थांबते. रेल्वे स्थानकावर आगी पासून बचाव करणारी साधनं आहेत.' समीर झवेरी यांनी नुकतीच मुंबईच्या रेल्वे प्रशासनाकडे माहिती अधिकार कायदा 2005 या अंतर्गत विविध मुद्द्यांची माहिती मागवली होती. माहिती अधिकारात त्यांना मिळालेल्या माहितीमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली 'की कोणत्याही लोकल ट्रेनमध्ये आग लागली, तर त्याक्षणी स्वयंचलित अलार्म आणि आगीपासून बचाव करणारी व्यवस्था उपलब्ध नाही.'


आगीची सूचना आणि बचाव रेल्वेचे कर्तव्य :समीर झवेरी यांनी याकडे लक्ष वेधलेलं आहे की "भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या या वर्षीच्या फायर सेफ्टी बाबत रेल्वे आयोगाने ज्या शिफारशी केलेल्या आहेत. त्यामध्ये एक्सप्रेस ट्रेन आणि लोकल ट्रेन असा भेदभाव न करता प्रत्येक ट्रेनमध्ये तसंच दर रेल्वे स्थानकामध्ये आगीपासून स्वयंचलित धोक्याची सूचना देणारी यंत्रणा आणि बचाव करणारी व्यवस्था उपलब्ध असली पाहिजे; असं म्हटलेलं आहे. मात्र प्रत्यक्षात मुंबईच्या कोणत्याही लोकलमध्ये तिन्ही मार्गावर अशी कोणत्याही पद्धतीची व्यवस्था उपलब्ध नाही. हे तर रेल्वेचं कर्तव्य आहे.


दर दोन मिनिटांनी स्टेशनवर लोकल थांबते :मध्य रेल्वेच्या प्रशासनाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शिवराज मानसपुरे म्हणाले की," प्रत्येक लोकलचे जे मोटरमन आणि गार्ड आहेत, ट्रेन मॅनेजर आहेत. त्यांच्याकडे केबिनमध्ये आगीपासून बचाव करणारे साहित्य आहेत. तसंच मुंबईच्या उपनगरीय लोकल या दर दोन मिनिटागणिक प्रत्येक रेल्वे स्थानकात थांबतात. त्याच्यामुळे आग जर लागली, तर रेल्वे स्थानकात बाचाव करणारे इन्स्ट्रुमेंट व्यवस्था आहे ते उपयोगाला येते. लोकल स्टेशनचं अंतर कमी असल्यामुळं आग लागल्यावर प्रथमदर्शनी त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यात रेल्वे स्थानकाकडून मदत होते. त्यामुळेच प्रत्येक लोकलमध्ये तशी यंत्रणा व्यवस्था नाही."



दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान आग लागली तर करणार काय :याबाबत माहिती अधिकार अंतर्गत अर्ज दाखल करणारे समीर झवेरी म्हणाले," की प्रत्येक लोकलमध्ये आगी पासून धोक्याची सूचना देणारी यंत्रणा आणि बचाव करणारी व्यवस्था नाहीय. 'बुलेट ट्रेन वर एवढा खर्च करताय इकडे देखील करावा' रोज 75 लाख प्रवासी लोकलने ये जा करतात. समजा ट्रेन एका स्टेशन वरून निघाली आणि दुसऱ्या स्टेशनवर येण्याआधीच तिला आग लागली. आणि रात्रीचा वेळ असल्यावर आगीपासून बचाव कसा करणार. स्वयंचलित साधनं व्यवस्था रेल्वे प्रशासनाकडे याबाबत कोणतीही व्यवस्था नाही. भारतात अडीच कोटी जनता रोज रेल्वेने प्रवास करते या सर्वांचा जीव लाखमोलाचा आहे.रेल्वे प्रशासनानेच ही माहिती माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज केल्यावर दिलीय."

हेही वाचा :

  1. Western Railway News : प्रवाशांना दिवाळी भेट! सोमवारपासून एसी लोकलच्या 17 फेऱ्यांत वाढ
  2. Mumbai Local Mega Block : दिवाळीच्या खरेदीकरिता घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचे हाल, 'या' मार्गांवर आहे मेगाब्लॉक
  3. Mumbai Local Mega Block : उद्या मुंबईत मेगाब्लॉक...मध्य, हार्बरच्या प्रवाशांना टेन्शन! वाचा वेळापत्रक

ABOUT THE AUTHOR

...view details