महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Theaters History In Mumbai : दामोदर नाट्यगृहाची पुनर्बांधणी तर गणेश टॉकीज जमीनदोस्त, काय आहे रंगभूमी व चित्रपटगृहांचा इतिहास? - मुंबईतील चित्रपटगृहांचा इतिहास

Theaters History In Mumbai: मराठी माणसाला तीन आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे राजकारण, क्रिकेट आणि नाटक. याशिवाय मराठी माणूस जगूच शकत नाही, (Damodar Theatre) असं म्हटलं तरी ते अतिशयोक्ती ठरणार नाही. सुरुवातीला कॉलेजमधून एकांकिका (One Acts) मग प्रायोगिक नाटक आणि नंतर व्यावसायिक नाटक असा या कलाकारांचा प्रवास. (Ganesh Talkies) या कलाकारांचे यशाचे साक्षीदार असलेले आणि जिथून कलाकारांनी सुरुवात केली, ते गिरणगावातील अनेक नाट्यगृह, सांस्कृतिक रंगभूमी तसेच सिनेमागृह आज मोठ्या प्रमाणात बंद होताहेत. (Experimental Plays)

Theaters History In Mumbai
दामोदर नाट्यगृहाची पुनर्बांधणी

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 6:42 PM IST

Updated : Nov 5, 2023, 7:40 PM IST

मुंबईTheaters History In Mumbai: गिरणगावात मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय कुटुंब आणि कामगारांची वस्ती, त्यामुळं येथे अगदी खिशाला परवडेल एवढ्या कमी दरात तिकिट घेऊन नाटक व चित्रपट पाहता येत असे. यामुळं स्वाभाविकपणे इथल्या लोकांचं एक प्रकारचं भावनिक नातं, नाळ गिरणगावातील नाट्यगृह व सिनेमागृहांशी जोडली होती. मात्र मागील अनेक वर्षांपासून येथील नाट्यगृह व सिनेमागृह बंद होतायेत. नुकतंच ज्या नाट्यगृहानं अनेक मराठी कलाकार घडवले आणि शतकी वाटचाल पूर्ण केलेल्या दामोदर नाट्यगृहाची पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, मागील १०-१५ वर्षांपासून बंद असणारी गणेश टॉकीज देखील याच दिवशी जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळं आता गिरणगावातील लोकांनी नाटक किंवा सिनेमा कुठे पाहायचा? असा भावनिक व नाराजीचा सवाल उपस्थित केला जात आहे.


कसा आहे सिनेमागृहांचा इतिहास:दरम्यान, कामगार वर्गातील कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून दामोदर नाट्यगृह उभारण्यात आलं होतं. या नाट्यगृहानं मुंबईकरांचं अनेक दशकं मनोरंजन केलं. मात्र हे नाट्यगृह आता नव्या रुपात नव्या ढंगात नाट्यरसिकांच्या सेवेत येणार आहे. कोरोनानंतर दादर येथील शिवाजी मंदिर व यशवंत नाट्यगृहाची देखील पुनर्बांधणी करण्यात आली. ज्या दिवशी दामोदर नाट्यगृह बंद करण्यात आलं त्याच दिवशी लालगबागमधील गणेश टॉकीजही पाडण्यात आली. गणेश टॉकीज १९५७ मध्ये उभारण्यात आली होती. या सिनेमागृहाचं वैशिष्ट म्हणजे जुन्या पद्धतीचं आणि सिंगल स्क्रीन असलेलं चित्रपटगृह होतं. तसेच येथे प्रत्येक आठवड्याला एक हिंदी चित्रपट प्रदर्शित होत असे. हे मागील १०-१५ वर्षांपासून बंद होते. गणेशोत्सवात येथे मोठी गर्दी होत असे. यादरम्यान, येथे चित्रपट पाहण्यास येणाऱ्यांची संख्या देखील मोठी असायची. मुंबईतील आज बरेच चित्रपटगृह बंद पडले आहेत.

गिरणगावातील चित्रपटगृहांचा प्रवास:गिरणगावातील चित्रपटगृहांचा प्रवास जर आपण पाहिला तर सातरस्ता परिसरातील न्यू शिरीन, लालबागमधील गणेश टॉकीज, भारतमाता सिनेमागृह, जयहिंद, माझगावचे स्टार, भायखळाचं पॅलेस, डिलाईल रोडवर येथे प्रकाश टॉकीज हे सिनेमागृह मागील २५-३० वर्षांपासून बंद आहे. पुढे धनमिल नाका येथे दीपक, प्रीमियर, चित्रा, शारदा अशी अनेक चित्रपटगृह पाहायला मिळत. तसेच मुंबईतील अन्य भागातही म्हणजे गिरगावातील मॅजेस्टिक, रॉक्सी, पुढे ऑपेरा हाऊस, इंपिरियल, नाझ, मग स्वस्तिक, नाॅव्हेल्टी, अप्सरा, मिनर्व्हा त्यानंतर मुंबई सेंट्रर येथील मराठा मंदिर अशी सिनेमागृह. पण आज यातील अनेक चित्रपटगृह बंद पडली आहेत. यातील काहींची जागा मोठमोठ्या स्क्रीन, मल्टिप्लेक्स संस्कृतीनं घेतली आहे. वरील चित्रपटगृहात पॉपकॉर्न १० ते २० मिळत होते. त्याच ठिकाणी आता मल्टिप्लेक्स थेअरटरमध्ये १०० ते १५० रुपयांना पॉपकॉर्न मिळते. याची झळ सामान्य लोकांना बसत आहे, परिणामी इच्छा असून देखील केवळ तिकिट परवडत नसल्यानं रसिक चांगल्या सिनेमांकडे पाठ फिरवताहेत. चित्रपटगृह जगली तर तिथले कर्मचारी जगतील किंबहुना नाट्यगृह व सिनेमागृहांमुळे कित्येकांना रोजगार मिळतो. सिनेमा, नाटक पाहता यावी, यासाठी चित्रपटगृह, नाट्यगृह जगावी अशी मालकाची आणि चित्रपट रसिकांची देखील इच्छा आहे. पण बंद पडत जाणारी चित्रपटगृहं ही चिंतेची बाब आहे, असं चित्रपटसृष्टीतील जाणकारांचे म्हणणं आहे.

तर कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड?दुसरीकडे परेलमधील दामोदार नाट्यगृहानं गिरणगावातील अनेक कलाकार घडवले. याच नाट्यगृहात आजचे आघाडीचे नायक भरत जाधव व सिद्धार्थ जाधव यांची पहिली एकांकिका येथेच पार पडली. अनेकांनी अभिनयाचा श्रीगणेशा या रंगमंचावर केला; पण चार दिवसांपूर्वी हे नाट्यगृह पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आलं आहे. दिवाळीच्या तोंडावरच हे नाट्यगृह बंद पाडण्यात आल्यामुळं कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असून ऐन दिवाळीतच कर्मचाऱ्यांचं दिवाळं निघालं आहे. दिवाळीपूर्वीच व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांकडून राजीनामे घेतले आहेत. त्याबदल्यात किती नुकसान भरपाई मिळणार याची त्यांना कल्पना नाही. त्यांनी योग्य मोबदला देण्याचं आश्वासन दिलंय. मात्र याची खात्री कर्मचाऱ्यांना नाही. येथे १ इलेक्ट्रीशिन, १ स्टेज सफाई कामगार कंत्राटी कामगार आहेत. याशिवाय १ इलेक्ट्रीशियन, १ सिक्युरिटी गार्ड कायमस्वरूपी आहे. डोअरकीपरना शोनुसार पैसे दिले जातात. मात्र ऐन दिवाळीत हे नाट्यगृह का बंद करण्यात आलं, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, गिरणगावात चित्रपटगृह किंवा नाट्यगृह बंद पडता कामा नये. कारण या दोन्ही ठिकाणी अनेक कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह या दोन्हीवर चालत असतो. तसेच या ठिकाणातील लोकांचे एकप्रकारचे भावनिक नाते नाट्यगृह व चित्रपटगृहाशी जोडलेले असते.

तरच चित्रपटगृह, नाट्यगृह टिकतील:गणेश टॉकीजसारख्या सिनेमागृहात अगदी माफक दरात सिनेमा पाहयला मिळत असे. त्यामुळं नाट्यगृह व चित्रपटगृह यापैकी काहीही बंद पडणं ही चिंतेची बाब आहे. हे दोन्ही बंद न होण्यासाठी मायबाप रसिक व मालक या दोघांनीही पुढाकार घेतला पाहिजे. फक्त सरकारला दोष देऊन चालणार नाही आपलीही तेवढीच जबाबदारी आहे, असं चित्रपट समीक्षक श्रीराम खाडिलकर यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे जरी दामोदर नाट्यगृहाची पुनर्बांधणी होऊन कोणत्याच जुन्या कर्मचाऱ्यांना कमी न करता, पुन्हा कामावर ठेवावे; पण याउलट झाले तर ते चुकीचं होईल, असं देखील चित्रपट समीक्षक श्रीराम खाडिलकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दामोदर नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीबाबत शाळा आणि हॉलची भव्यदिव्य योजना आखली आहे. मुलांचं नुकसान होऊ नये यासाठी हॉलची इमारत तोडून तिथे शाळा उभारून शाळेच्या जागी हॉल तयार करणार आहे. हे करताना कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढणार नाही, असं द सोशल सर्व्हिस लीगचे अध्यक्ष आनंद माईणकर म्हणाले. पण एक मात्र नक्की की, नाट्यगृह आणि चित्रपटगृह टिकवण्यासाठी आणि जगण्यासाठी मालक, मायबाप रसिक प्रेक्षक यांनी पुढाकार घेतला पाहिजे. सरकारने सुद्धा उदासीनता न दाखवता नाट्यगृह व चित्रपटगृह का बंद होत आहेत यावर तोडगा काढला पाहिजे. तर आणि तरच नाट्यगृह आणि सिनेमागृह टिकतील, जगतील आणि पुन्हा एकदा या दोन्हींना गतवैभव प्राप्त होईल, यात तीळमात्र शंका नाही. मागील अनेक वर्षांपासून येथील नाट्यगृह व सिनेमागृह बंद होताहेत. नुकतंच ज्या नाट्यगृहानं अनेक मराठी कलाकार घडवले आणि शतकी वाटचाल पूर्ण केलेल्या दामोदर नाट्यगृहाची पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागील १०-१५ वर्षांपासून बंद असणारी गणेश टॉकीज देखील याच दिवशी जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळं आता गिरणगावातील लोकांनी नाटक किंवा सिनेमा कुठे पाहायचा? असा भावनिक व नाराजीचा सवाल उपस्थित केला जातोय.

हेही वाचा:

  1. Maratha Reservation Suicide : मराठा आरक्षणासाठी तब्बल 'इतक्या' आत्महत्या; मराठवड्यात प्रमाण जास्त
  2. Lok Sabha Elections २०२३ : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरुन रस्सीखेच; रामदास कदमांनी थेटच सांगितलं
  3. Maratha Reservation : मराठा आरक्षण, कुणबी नोंदीच्या मुद्द्यावर सोमवारी मंत्रालयात महत्त्वाची बैठक
Last Updated : Nov 5, 2023, 7:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details