महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विक्रोळी पार्क साईटजवळील संरक्षक भिंतीचा कडा कोसळला, जीवितहानी नाही - Ground

आज सकाळी ९ च्या सुमारास विक्रोळी पार्क साईट विभागातील सोमेश्वर मंडळाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

विक्रोळी पार्क साईटजवळील संरक्षक भिंतीचा कडा कोसळला

By

Published : Jul 6, 2019, 3:05 PM IST

मुंबई- उपनगरात शुक्रवारी रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे विक्रोळी पार्क साईट येथील सोमेश्वर मंडळाच्या मैदानाजवळील प्रगती सोसाईटीच्या संरक्षक भिंतीचा कडा कोसळून चार घरांना धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुंबईत भिंत कोसळण्याच्या घटना वाढतच आहेत. नुकतंच मुंबईच्या मालाडमध्ये संरक्षक भिंत कोसळून तब्बल २१ कामगारांचा मृत्यू झाला होता. डोंगर उतारावर आणि अडगळीच्या जागी उभ्या असणाऱ्या झोपड्यांवर या संरक्षक भिंती कोसळत अनेक दुर्घटना घडत आहेत.

विक्रोळी पार्क साईटजवळील संरक्षक भिंतीचा कडा कोसळला

अशात आज सकाळी ९ च्या सुमारास विक्रोळी पार्क साईट विभागातील सोमेश्वर मंडळाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. यामुळे या भिंती लगत असलेल्या अमरदीप मोहन मयेकर, अभिषेक गावडे, चंद्रकांत जोशी आणि नयन शंकर बनप यांच्या घरांना धोका निर्माण झाला असून याठिकाणी अग्निशामक दल आणि स्थानिक पोलिसांनी पाहणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details