मुंबई- जुहू बीचवर बुधवारी समुद्रात बुडणाऱ्या दोन युवकांची जीवरक्षकांनी सुखरूप सुटका केली. रोहित कांबळे आणि संजय आला, अशी या युवकांची नावे आहेत.
जुहू बीचवर बुडणाऱ्या दोघांना जीवरक्षकांनी वाचवले - जीवरक्षक
रोहित कांबळे आणि संजय आला, अशी या युवकांची नावे आहेत.
जुहू बीचवर रोहित कांबळे व संजय आला हे दोन १७ वर्षीय तरुण जेटी ५ पॉईंटकडे फिरण्यासाठी आले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास दोघेही पाण्यात उतरले. यावेळी खेळता- खेळता ते लाटांच्या प्रवाहाने ओढले गेले. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघेही बुडू लागले. याच वेळी १०० मीटर अंतरावर असलेल्या जेटीचा त्यांनी आधार घेतला. हा प्रकार किनाऱ्यावरील नागरिकांनी पाहून आरडाओरड सूरू केली. यावेळी तैनात असलेल्या मंगलदास खतेले आणि उमेश निजाई या जीवरक्षकांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही रेस्क्यू ट्यूबच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले असून याबाबत चौकशी करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आपत्कालीन विभागाने दिली.