मुंबई - गृह खात्याने राज्यातील १० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदली केलेल्या या सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ नव्या नेमणुकीवर हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
कोणाची कुठे झाली नेमणूक
मुंबई - गृह खात्याने राज्यातील १० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदली केलेल्या या सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ नव्या नेमणुकीवर हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
कोणाची कुठे झाली नेमणूक
पी. व्ही. उगले यांची नवे पोलीस अधीक्षक म्हणून जळगाव येथे बदली करण्यात आली आहे. पूर्वी ते नाशिकचे एसपी होते. विनिता साहू यांची गोंदियाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. पूर्वी त्या भंडाऱ्याच्या पोलीस अधीक्षक होत्या. हरिष बैजल यांची एसआरपीएफच्या समदेशक म्हणून धुळे जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी ते गोंदिया पोलीस अधीक्षक होते. अरविंद साळवे यांची भंडाऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी ते महावितरणचे पोलीस अधीक्षक होते. जयंत मीना यांची अप्पर पोवीस अधीक्षक म्हणून बारामती ग्रामीणसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी ते अमरावतीचे अप्पर पोलीस अधीक्षक होते. पंकज देशमुख यांची पुणे शहरचे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते पूर्वी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक होते.
दत्ता शिंदे यांची पोलीस अधीक्षक सुरक्षा महावितरण मुंबई येथे बदली झाली आहे. पूर्वी ते जळगावचे पोलीस अधीक्षक होते. तेजस्वी सातपुते यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पूर्वी पुणे शहरच्या पोलीस उपायुक्त होत्या. इशू सिंधू यांची अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पूर्वी निवासी उपायुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे कार्यरत होत्या. रंजनकुमार शर्मा यांची पोलीस अधीक्षक सीआयडी म्हणून नागपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी ते अहमदनगरचे पोलीस अधीक्षक होते.