नवी दिल्ली - राज्यातील सत्ताबदल आत जवळपास निश्चित झाला आहे. भाजप आणि शिवसेनेने काडीमोड घेतला आहे. त्या पार्श्वभूमिवर राज्यसभेत बदल दिसून आला. जे शिवसेना खासदार सत्ताधारी बाजुने बसत होते. त्यांना आजपासून विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे. त्यानुसार आज आसन व्यवस्था बदलण्यात आली.
राज्यसभेत शिवसेनेचे तीन खासदार आहेत. यात शिवसेना नेते अनिल देसाई, संजय राऊत आणि उद्योजक राजकुमार धूत यांचा समावेश आहे. शिवसेना केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक होती. पण, शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना रालोआमधून बाहेर पडली हे स्पष्ट झाले. पण, अधिकृतरित्या शिवसेना आणि भाजप दोघांनीही अशी घोषणा केली नाही. त्या पार्श्वभूमिवर आजची घटना महत्वाची आहे.
हेही वाचा -जम्मू-काश्मीरमध्ये आता उर्दू नव्हे; तर, हिंदी होणार व्यवहाराची भाषा