मुंबई - मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असताना डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. मुंबईमधील कोरोनामधून बरे होणाऱ्यांमध्ये 10 ते 29 वयोगटातील प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 35 टक्के इतके आहे. 10 वर्षाखालील बरे होणाऱ्यांचे प्रमाण 32 टक्के तर त्या खालोखाल 30 ते 49 वयोगटातील बरे होणाऱ्यांचे प्रमाण 30 टक्के इतके आहे.
Coronavirus : मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांमध्ये 'या' वयोगटातील रुग्णांचे प्रमाण अधिक - मुंबई कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
मुंबईमधील कोरोनाचे रुग्ण आणि डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची आकडेवारी पालिकेने प्रसिद्ध केली आहे. त्यात मुंबईमध्ये कोरोनाचे सुमारे 23847 रुग्ण आहेत. त्यापैकी 6751 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधील कोरोनामधून बरे होणाऱ्यांमध्ये 10 ते 29 वयोगटातील प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 35 टक्के इतके आहे.
कोरोनातून बरे होणाऱ्यांचे सर्वात कमी प्रमाण 70 वर्षाहून अधिक वयामधील रुग्णांमध्ये म्हणजेच अवघे 15 टक्के इतकेच आहे. मुंबईमधील कोरोनाचे रुग्ण आणि डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची आकडेवारी पालिकेने प्रसिद्ध केली आहे. त्यात मुंबईमध्ये कोरोनाचे सुमारे 23847 रुग्ण आहेत. त्यापैकी 6751 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे म्हटले आहे. एकूण रुग्णांच्या प्रमाणात डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचे प्रमाण 28 टक्के इतके आहे. डिस्चार्ज देण्यात आलेल्यांपैकी 46 टक्के महिला तर 54 टक्के पुरुष रुग्ण आहेत. डिस्चार्ज देण्यात आलेल्यांपैकी 5524 पालिकेच्या तर खासगी रुग्णालयातून 1277 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
मुंबईत कोरोना विषाणूची लागण झालेले 10 वर्षाखालील 481 रुग्ण आहेत त्यापैकी 155 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार हे प्रमाण 32 टक्के इतके आहे. 10 ते 29 वर्षामधील 5317 रुग्ण आहेत त्यापैकी 1912 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे प्रमाण 35 टक्के इतके आहे. 30 ते 49 वर्षामधील 9299 रुग्ण आहेत त्यापैकी 2852 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे प्रमाण 30 टक्के इतके आहे. 50 ते 69 वर्षामधील 7131 रुग्ण आहेत त्यापैकी 1583 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे प्रमाण 22 टक्के इतके आहे. तर 70 वर्षांवरील 1619 रुग्ण असून त्यापैकी 249 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे प्रमाण 15 टक्के इतके आहे.