मुंबई -राजधानी मुंबईमध्ये गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारीपासून यात पुन्हा वाढ झाली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. लहान मुलांना देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. 11 मार्च ते 3 एप्रिल या 24 दिवसांच्या कालावधीत 19 वर्षाखालील तब्बल 6 हजार 372 मुले कोरोना पॉझिटिव्ह आली आहेत. मात्र, या वयोगटातील मृत्यूचे प्रमाण नगण्य असल्याचे समोर आले. मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी लागण होण्याचे प्रमाण वाढले असल्याने लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोना वाढला -
मुंबईत गेल्या वर्षी 11 मार्चला कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. या वर्षी 11 मार्चला कोरोनाच्या प्रसाराला एक वर्ष पूर्ण झाले. त्यादिवशी मुंबईत एकूण 3 लाख 38 हजार 631 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. तर, 11 हजार 515 मृत्यूची नोंद झाली होती. 3 एप्रिलपर्यंत 4 लाख 32 हजार 192 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे तर, 11 हजार 759 मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 दिवसात 93 हजार 563 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली असून 209 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
24 दिवसात 6 हजार 372 लहान मुले पॉझिटिव्ह -
मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असताना त्याची लागण लहान मुलांनाही होत आहे. 11 मार्चपर्यंत 0 ते 9 वयोगटातील 5 हजार 59 आणि 10 ते 19 वयोगटातील 13 हजार 138, अशी एकूण 18 हजार 197 मुले कोरोना पॉझिटिव्ह आली होती. 3 एप्रिलपर्यंत 0 ते 9 वयोगटातील 7 हजार 20 आणि 10 ते 19 वयोगटातील 17 हजार 549, अशी एकूण 24 हजार 569 मुले कोरोना पॉझिटिव्ह आली आहेत. ही आकडेवारी पाहिल्यास गेल्या 24 दिवसात 19 वर्षाखालील 6 हजार 372 लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह आली आहेत. गेल्या 24 दिवसात 0 ते 9 वयोगटातील 4 हजार 411 मुले पॉझिटिव्ह आली आहेत.
मृत्यूचे प्रमाण नगण्य -