मुंबई - यंदाच्या उन्हाळ्यात पडलेल्या दुष्काळामुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तसेच दिवसागणिक वाढत असलेल्या उन्हामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे सर्वजण पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. यंदा चांगला पाऊस पडावा म्हणून आज दादरमधील एका मंदिरामध्ये पुजाऱ्याने पाण्यात बसून पूजा केली.
पावसासाठी मंदिरात पुजाऱ्याने केली पाण्यात बसून पूजा - water
काही दिवसांपूर्वी थोडासा पाऊस पडल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला मात्र उकाडा जाणवू लागला. पावसाळ्याचा ऋतु असूनही म्हणावा तसा पाऊस अद्याप पडला नाही. मुंबईत दादरमध्ये मंदिरातील एका पुजाऱ्याने देवाकडे चांगला पाऊस पडावा, यासाठी पाण्यात बसून पूजा केली आहे.
पावसासाठी मंदिरात पुजाऱ्याने केली पाण्यात बसून पूजा
काही दिवसांपूर्वी थोडासा पाऊस पडल्यामुळे वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे. पावसाळ्याचा ऋृतु असूनही म्हणावा तसा पाऊस अद्याप पडला नाही. वेळेवर पाऊस न पडल्यामुळे नागरिकांसह शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे मुंबईत दादरमध्ये मंदिरातील एका पुजाऱ्याने देवाकडे चांगला पाऊस पडावा, यासाठी पाण्यात बसून पूजा केली आहे. हे पुजारी दादर येथील स्वामीनारायन मंदिरात पाण्याच्या भांड्यात बसून पूजा करत आहेत. ते देवाला साकडे घालत आहेत की, पाऊस लवकर पडावा आणि जमीन ओली व्हावी, अशी मागणी करत आहेत.
हवामान खात्याने पुढील दोन दिवसात राज्यात पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या पुजाऱ्यांनी केलेली पूजा व हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज त्यामुळे पाऊस पडेल, अशी आशा सर्वच नागरिक करत आहेत.