महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

​​मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् प्रकाश आंबेडकरांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी अचानक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्रालयात भेट घेतली. राजकीय चर्चांना यामुळे उधाण आले आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मध्यप्रदेशातून आणण्यावर सल्लामसलत केली जाणार असल्याचे समजते.

meeting between Chief Minister Eknath Shinde and Prakash Ambedkar
​​मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् प्रकाश आंबेडकरांची भेट

By

Published : Dec 13, 2022, 10:13 PM IST


मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय घडत आहे असा प्रश्न पडला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची काही दिवसांपुर्वी भेट झाली. त्यानंतर ते एकत्र येणार अशीही जोरदार चर्चा आहे. दरम्यान, ती चर्चा रंगात असातानाच आता प्रकाश आंबेडकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. त्यानंत आता या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाविषयी भेट - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आंबेडकर यांची मंत्रालयात भेट झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रालयात बैठक झाली. दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत ही महत्वपूर्ण बैठक असल्याचे समजते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मध्यप्रदेश ऐवजी दिल्लीहून बनवून आणण्यासंदर्भात ही बैठक बोलावली असल्याची सूत्रांकडून मिळाली आहे. दादरच्या आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याबाबत आक्षेप अनेकांनी घेतला होता. या अनुषंगाने काही बदल करण्याविषयी चर्चा करण्यासाठी ही बैठक घेतल्याचीही माहिती समोर आली आहे.

आमच व्यासपिठ एकच - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर एकत्र येणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका जाहीर कार्यक्रमात तशा प्रकारचे संकेत नुकतेच दिले आहेत. आंबेडकर आणि आमचे वैचारिक व्यासपीठ एकच आहे. स्वातंत्र्य वाचवण्यासाठी एकत्र येऊयात असही ते यावेळी माहणले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आंबेडकरांसोबत युतीचे संकेत दिले आहेत.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details