मुंबई - सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मुंबईतील कोस्टल रोडसाठी सोईल टेस्टिंग परवानगीशिवाय कोणतीही परवानगी महापालिकेकडे नाही. असा गौप्यस्पोट नॅशनल वर्क फॉर्म या राष्ट्रीय मच्छीमार संघटना अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीतर्फे करण्यात आला आहे. या प्रकल्पाबाबत कोणत्याही मच्छीमार बांधवांबरोबर चर्चा करण्यात आली नसल्याने या रोडला आमचा विरोध असल्याचे संघटनेचे सरचिटणीस किरण कोळी यांनी सांगितले.
कोस्टल रोडला महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचा विरोध - website
फिशर डिपार्टमेंट महापालिकेला पारंपरिक मच्छीमारांना कोणताही धक्का न लागता त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या कामाबद्दलचे ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर सोईल टेस्टिंग परवानगीखेरीज महापालिकेने घेतली नसल्याचे कोळी यांनी सांगितले.
फिशर डिपार्टमेंट महापालिकेला पारंपरिक मच्छीमारांना कोणताही धक्का न लागता त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या कामाबद्दलचे ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर सोईल टेस्टिंग परवानगीखेरीज महापालिकेने घेतली नसल्याचे कोळी यांनी सांगितले. केंद्रीय समृद्धी मच्छी अनुसंधान संस्थान (सीएमएफआरआय) च्या परवानगीसह कोणतेही अहवाल घेतलेला नाही. त्यासह इतर कोणतीही विभागाची परवानगी महापालिकेने घेतली नसल्याचे थेट आरोप समितीकडून करण्यात आला आहे. महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया न करता समुद्रात सांडपाणी सोडत आहे. त्यामुळे यातील प्लास्टिकसारख्या घटकांमुळे अनेक समुद्री जीव नष्ट झाले आहेत, त्याचप्रमाणे सेइस्मिक सर्वेमध्ये केबलद्वारे मोठे स्फोट केले जात आहेत. या स्फोटांमध्ये ३०० ते ४०० किलोमीटर खाली असणाऱ्या क्रूड ऑइल त्यांची तपासणी केली जात असल्याने यात अनेक माशांचा जीव जात आहे. यामुळे सध्या मच्छीमारांना माशांचा दुष्काळ सहन करावा लागत आहे.
परवानगी मिळाल्यानंतर पावसाळ्यातील मच्छीमारांच्या प्रजननाकडे दुर्लक्ष करत महापालिकेने कामाला सुरुवात केली. मात्र, काम सुरू करण्यासाठी लागणारे इतर विभागांच्या परवानग्या घेण्यात तसेच पारंपरिक मच्छीमारांची चर्चा न करता हा प्रकल्प सुरू करण्यात आला. तसेच सीआरझेडमधील बदल करून वेबसाईट वरील सीआरझेड बदली दिशाभूल महापालिका करत आहे, असे किरण कोळी यांनी सांगितले.