महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

husband killed wife : दुसऱ्या महिलेच्या संगतीला लागलेल्या पत्नीला पतीने संपवले

गोरेगाव परिसरामध्ये राहणाऱ्या पतीने पत्नीची हत्या केल्याचा ( husband killed wife ) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नी चुकीच्या महिलेच्या संगतीला (in the company of another woman) लागली आणि वारंवार सांगूनही ऐकत नसल्याने पती ने गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे आरोपी पतीला पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे.

husband killed wife
पत्नीला पतीने संपवले

By

Published : May 28, 2022, 10:39 PM IST

मुंबई: अन्सार अली असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. तर रोझी खातून असे मयत पत्नीचे नाव आहे. महिलेच्या बहिणीने याबाबत फिर्यादीला माहिती दिल्यानंतर हत्येचा गुन्हा उघडकीस आला. पत्नीची हत्या ( husband killed wife ) केल्यानंतर पती घटनास्थळावरुन उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पळून गेला होता. मात्र दिंडोशी पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत आरोपीचा शोध घेत त्याला प्रयागराज येथून अटक केली. आरोपी विरोधात दिंडोशी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

अन्सार अली हे मुंबईतील गोरेगाव परिसरातील संतोष नगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. आरोपी वाहन चालक म्हणून काम करतो आणि तो अनेकदा कामानिमित्त बाहेर असायचा. याच दरम्यान पत्नी चुकीच्या संगतीत लागल्याचे आरोपी म्हणणे आहे. (in the company of another woman) वारंवार समजावूनही पत्नी संगत सोडण्यास तयार नव्हती. रात्री उशिरापर्यंत फोनवर व्यस्त असायची. याचाच राग पतीच्या मनात होता. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे दोघे पती-पत्नी जेवण करुन झोपले. त्यानंतर रात्री गाढ झोपेत असताना आरोपीने उशीने पत्नीचा गळा आवळला यात पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सूत्र हलवले आणि आरोपीला उत्तर प्रदेश मधील प्रयागराज मधून अटक केली असून त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.

हत्येची माहिती मिळताच दिंडोशी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील आणि रेल्वे स्थानकातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपासानंतर आरोपी अन्सार अली छपरा गेदान एक्स्प्रेसने प्रवास करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार या रेल्वेच्या मार्गावरील प्रत्येक रेल्वे स्थानकावरी पोलिसांना अलर्ट करण्यात आले. दिंडोशी पोलिसांचे एक पथकही हवाईमार्गे उत्तर प्रदेशात प्रयागराज स्थानकावर जाऊन पोहचले. एक्स्प्रेस रेल्वे स्थानकात आल्यानंतर प्रत्येक प्रवाशाची पोलिसांनी तपासणी केली. तर पोलिसांच्या एका पथकाने संपूर्ण रेल्वेची तपासणी केली असता आरोपी एका टॉयलेटमध्ये लपून बसलेला सापडला. पोलिसांनी त्यास अटक करुन मुंबईत आणले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details