मुंबई- कोरोनाच्या संकटानंतर सुरू झालेल्या संचारबंदीमुळे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध असलेल्या आणि मुंबईची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजाबाई टॉवरच्या घड्याळाची टिक टिक बंद पडली होती. मात्र, ऐनवेळी येथील सुरक्षा रक्षक विभागाने या घड्याळाला चावी देण्याची जबाबदारी स्वीकारली आणि या घड्याळाची टिक टिक पुन्हा सुरू झाली आहे.
...आणि राजाबाई टॉवरवरील घड्याळाची टिक टिक झाली पुन्हा सुरू - घड्याळ
मुंबई विद्यापीठातील या ऐतिहासिक घड्याळाला चावी देण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीच्या व्यक्तीला देण्यात आली आहे. मात्र, संचारबंदीमुळे चावी देणाऱ्या व्यक्तीला फोर्ट परिसरात येणे अडचणीची झाले होते. यामुळे मागील १७० वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेले हे राजाबाई टॉवरवरील ऐतिहासिक घड्याळ बंद पडले होते. पण, विद्यापीठ प्रशासनाने त्या चावी व्यक्तीला बोलावून घेतले आणि सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देत घड्याळ सुरु केले.
राजाबाई टॉवरवरील घड्याळ
देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या घड्याळ आतून प्रत्येक तासागणिक 'गॉड सेव्ह द क्वीन' असे एक संगीत वाजले जायचे. परंतु स्वातंत्र्यानंतर त्यासाठीच्या असलेला गिअर आणि व्हीलला या घड्याळमधून बाजूला काढण्यात आले. अद्यापही या संगीताचे व्हील या टॉवरवर पडून आहेत. आता केवळ पंधरा मिनिटानंतर या घड्याळातील बेलचा आवाज परिसरात घुमत असतो.