मुंबई- अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यात सध्या उरूस सुरू आहे. यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी भगवी चादर चढवण्यासाठी पाठवली आहे.
अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याला मुख्यमंत्र्यांनी पाठवली चादर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सात वर्षे मातोश्रीवरून अजमेर येथील दर्ग्याला चादर पाठवली जाते. यंदाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेना कार्यकारणी सदस्य राहुल कनाल यांच्या हस्ते चादर मातोश्रीवरून अजमेर शरिफला पाठवली आहे.
गेली सात वर्षे मातोश्रीवरून अजमेर येथील दर्ग्याला चादर पाठवली जाते. यावर्षीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेना कार्यकारणी सदस्य राहुल कनाल यांच्या हस्ते भगवी चादर मातोश्रीवरून अजमेर शरिफला पाठवली आहे. मंगळवारी (दि. 24 फेब्रुवारी) ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्गावर चढवली जाणार आहे. त्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीनेही ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यावर चादर चढवली जाणार आहे.
हेही वाचा -अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक