मुंबई मुंबईतील धारावी येथील नाल्यात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून नाल्यातून मृतदेह बाहेर काढला आणि सायन रुग्णालयात पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात आला आहे. धारावी पोलिसांनी Dharavi Police अपघाती मृत्यू अहवाल दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Mumbai Crime: मुंबईत पुन्हा खळबळ, नाल्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह - मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ
Mumbai Crime: मुंबईतील धारावी येथील नाल्यात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून नाल्यातून मृतदेह बाहेर काढला आणि पोस्टमॉर्टमसाठी सायन रुग्णालयात पाठवला. धारावी पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवालदाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत
मुंबईतील धारावी येथील नाल्यात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. नाल्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत घडत असलेल्या गुन्ह्यांच्या घटना पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहेत. अशातच आणखी एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने हा व्यक्ती नक्की कोण आहे, त्याचा मृतदेह नाल्यात कसा गेला, त्याचा खून झाली की आत्महत्या, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.