मुंबई- एकीकडे विधानसभा निकाल लागून 14 दिवस उलटले तरी सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यात शिवसेनेने सत्तेत भाजप सोबत जाऊ नये, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
शिवसेनेने भाजपसोबत जाऊ नये, आपची मागणी - शिवसेना
शिवसेनेने सत्तेत भाजप सोबत जाऊ नये, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
बॅनर घेऊन थांबलेले आपचे कार्यकर्ते
मातोश्री बाहेर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते बॅनरसह दाखल झाले. महाराष्ट्रातील जनतेचे हित लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करू नये, असे निवेदन त्यांनी सोबत आणले होते. लेखी निवेदन त्यांनी शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंना देण्यासाठी दिले आहे.
Last Updated : Nov 6, 2019, 8:31 PM IST