महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोरोनाविरोधातील लढ्यात ठाकरे सरकार अपयशी'

मुंबईतील सेव्हन हिल, राजावाडी, हिरानंदानी रुग्णालयात नव्या कोरोनाबाधित रुग्णासाठी जागा नाही. क्वारंटाईन सेंटरमध्येही सोय नाही, त्यामुळे ठाकरे सरकार कोरोनाविरोधात अपयशी ठरले, असल्याचे माजी खासदार किरीट सोमैया म्हणाले

माजी खासदार किरीट सोमैया
माजी खासदार किरीट सोमैया

By

Published : May 3, 2020, 5:42 PM IST

मुंबई- शिवाजी नगर या भागात गेल्या 24 तासांमध्ये 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे या भागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे माजी खासदार किरीट सोमैया यांनी राज्य सरकार आणि पालिकेच्या कार्यशैलीवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले कोरोनाविरोधात हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.

बोलताना किरीट सोमैया

गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरातील प्लॉट क्रमांक 26, 29,43 येथे मागील 24 तासांत 6 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती सोमैया यांनी एका व्हिडिओद्वारे दिली आहे. कोरोना संकट पेलताना राज्य सरकार कोसळले आहे, अशी टीकाही सोमय्या यांनी केली आहे. एकाच दिवशी 6 लोकांचा मृत्यू होणे ही धक्कादायक बाब आहे.

मुंबईतील सेव्हन हिल, राजावाडी, हिरानंदानी रुग्णालयात नव्या रुग्णासाठी जागा नाही आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्णांना उपचार घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. ज्या ठिकाणी क्वारंटाईनची सोय आहे, तिथे कोणतीही सुविधा नाही. जेवण, पाणी, साफ-सफाई रुग्णाला पुरवले जात नाही. मी याबाबत रुग्णांच्या नावासह आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालिका प्रशासनाला पत्र लिहले आहे असे म्हणत, कोरोनाचे संकट पेलवलेले नासल्याचे या व्हिडिओमध्ये सोमैया यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -'आपण हसायचे दुसऱ्याला आणि शेंबूड आपल्या नाकाला' IFSC मुद्द्यावरुन आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details