मुंबई : राज्याच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत नाशिकच्या उमेदवारीवरून चांगलाच गोंधळ उडालेला आहे. काँग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांना वेळेआधीच ए.बी फॉर्म दिला गेला होता. मात्र, त्यांनी वेळेत तो फॉर्म दाखल केला नाही. दरम्यान, त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे हे अपक्ष म्हणून नाशिकच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये उभे राहिले आहेत. दरम्यान, यामध्ये सत्यजीत तांबे हे भाजपचा छुपा पाठिंबा घेत असल्याचा तर्क लावला जात आहे. काही दिवसांपूर्वी सत्यजीत यांच्या पुस्तक प्रकाशनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता त्यानी तांबे यांची चांगलीच स्तुती केली होती. त्या कार्यक्रमाचा संदर्भ देत भाजप पाठिंब्याची शंका राजकीय वर्तुळात बळावली आहे असे चित्र आहे. दरम्यान, आज झालेल्या बैठकित ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सत्यजित तांबे यांना नाही तर शुभांगी पाटील याना पाठिंबा आहे असे जाहीर करत नवा संघर्ष उभा केला आहे.
निवडणूक बिनविरोध होणार नाही : नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळूनही काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. या उलट त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सत्यजीत तांबे यांना भाजपची फूस असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे नाशिक पदवीधरची निवडणूक एकतर्फी होण्याची वा बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. नाशिक पदवीधरची निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं संजय राऊत यांनी ठणकावलं आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणुकीत शिवसेना मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्याचे संकेत देखील संजय राऊत यांनी आज माध्यमांसोबत बोलताना दिले.
भारतीय जनता पक्षाचे घर फुटेल तेव्हा त्यांना कळेल : खरे तर काँग्रेसच्या वरिष्ठांनी सुधीर तांबे यांचं नाव पदवीधर मतदार संघा करिता निश्चित केलं होतं त्यामुळे नाशिक मधून दुसरे कोणी काँग्रेसच्या वतीने अर्ज भरण्याचा प्रश्न नव्हता मात्र सत्यजित तांबे यांनी भाजपचा छुपा पाठिंबा मिळवण्यासाठी निवडणुकीच्या आधीच काही तयारी केल्याची बाप समोर आली आणि त्यामुळेच मोठा गदारो देखील झाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाठवले यांनी देखील खुलासा केलाच होता की सत्यजित तांबे हे काँग्रेसचे उमेदवार नाहीत त्यांच्या उमेदवारीबाबत त्यांनी काँग्रेसला बिलकुल कळवलेलं नाही त्यामुळे ते अपक्ष उमेदवार आहेत. तसेच, भारतीय जनता पक्ष आज प्रत्येकाचे घर पडत आहे. मात्र, येत्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे घर फुटेल तेव्हा त्यांना खरेच दुःख काय आहे ते समजू शकेल.
दगाफाटा होऊ शकतो : या सर्व पार्श्वभूमीवर शुभांगी पाटील ह्या पदवीधर मतदार संघामध्ये शिवसेनेच्या पाठिंबाने या निवडणुकीमध्ये रंगत आणणार आहेत. संजय राऊत यांनी पुढे म्हटले कि, पदवीधर निवडणुकीत काही दगाफाटा होऊ शकतो. म्हणून काँग्रेस कडून योग्य समन्वय असायला हवा होता. मात्र संजय राऊत यांनी सांगितले, कि सुधीर तांबे यांनी ए बी अर्ज मिळून देखील त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही . त्यासाठी काँग्रेस पक्षाला दोष देता येणार नाही . ह्या बाबत मविआ एकमताने निर्णय घेणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक बिनविरोध होणार नाही . कडवं आव्हान दिले जाईल हे मात्र खरं आहे.
वेगाने घडामोडी घडणार : संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले असल्याने तसेच शुभांगी पाटील तडक मातोश्रीवर उठाव ठाकरे यांच्या भेटीला निघाल्या त्यामुळेच जी निवडणूक बिनविरोध म्हणून होणार होती. आता मात्र शुभांगी पाटील यांच्या उमेदवारीमुळे रंगतदार ठरणार आहे. त्यामुळेच भाजपच्या छुप्या पाठिंब्यावर उभे राहणाऱ्या सत्यजित तांबे यांना जड जाणार हे मात्र नक्की . त्यामुळेच नाशिकमध्ये वेगाने घडामोडी घडणार त्या काही शंका नाही.