मुंबई Diwali 2023 :ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदूंचा सर्वात मोठा सण म्हणून आपण दिवाळीकडं पाहतो. दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे जल्लोष अशा सणासुदीच्या वातावरणात मी राजकारणावर बोलणार नसल्याचं त्यांनी माध्यामांना सांगितलंय. राजकारणातील 'कारीट' नंतर फोडणार, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.
सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका :उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख ( उबाठा गट ) उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यात केलेल्या शक्तीप्रदर्शनमध्ये सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली होती. तुमच्यात दम असेल, तर समोर या, तुमचे जास्त दिवस राहिले नाहीय. पुढच्या निवडणुकीत तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नसल्याचा हल्लाबोल त्यांनी शिंदे गटावर केला होता. या संदर्भात अनिल परब यांना प्रश्न विचारण्यात आला होता. "आज आपण याबाबत कोणतंच उत्तर देणार नाही, कारण आज केवळ किरीट फोडायचा असतो, बाकी काहीही फोडायचं नसतं. राजकीय गोष्टीसाठी खूप वेळ आहे", असं ते म्हणाले.
आज फक्त कारीट फोडायचा दिवस : "महाराष्ट्रातील जनतेला शिवसेनेच्या वतीनं मनःपूर्वक शुभेच्छा देतो. नागरिकांना दिवाळी, सुखाची, समृद्धीची जावो, अशी ईश्वराकडं प्रार्थना करतो." ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला होता. त्यावर काल महाराष्ट्राच्या जनतेनं सर्व पाहिलं आहे. त्यामुळं आज राजकीय काही बोलायचं नसल्याचं म्हणत परब यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळलं.
फुसका बार युटर्न :मुंब्य्रातील शिवसेनेची शाखा तोडण्यावरुन ठाण्यात शिंदे गट, ठाकरे गटात हायव्होल्टेज ड्रामा झाला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाला आव्हान दिलं होतं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केलीय. ठाण्यात फुसके बार आले होते. मात्र, आमच्या नरेश म्हस्के, तसंच महिला आघाडीनं चांगले फटाके फोडले. त्यामुळं फुसक्या बारांनी यू-टर्न घेत पळ काढल्याचं ते म्हणाले होते. याशिवाय दिघे साहेबांचा हा बालेकिल्ला आहे. त्यामुळं अशा फुसक्या बारांच्या आव्हानाला आम्ही महत्व देत नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- Sanjay Raut News : '31 डिसेंबरनंतर दूध का दूध, पाणी का पाणी होणार', मुंब्रा शाखेवरून संजय राऊतांचा इशारा
- Diwali 2023 wishes : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह विविध राजकीय नेत्यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!
- Maratha Reservation : 'माधव' फॉर्म्युलानं मराठा समाजाला 50 टक्क्यांतच आरक्षण देणं शक्य- माजी खासदार हरिभाऊ राठोड