मुंबई : खिचडी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून सूरज चव्हाण यांची चौकशी सुरू आहे. आज सहा तास त्यांची चौकशी करण्यात आली आहे. सूरज चव्हाण हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांना या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आला होता. त्यानुसार ते आज चौकसीसाठी हजर झाले होते.
सूरज चव्हाण यांच्या अडचणीत वाढ : सूरज चव्हाण काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून देखील चौकशी करण्यात आली होती. कथित कोव्हिड घोटाळ्याप्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी करण्यात आली होती. तसेच ईडीकडून चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी छापा देखील टाकण्यात आला होता. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावल्याने आता पुन्हा एकदा सूरज चव्हाण यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
१६० कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप: यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे खासदार संजय राऊत, माजी मंत्री अनिल परब, माजी मंत्री रविंद्र वायकर यांची देखील चौकशी झाली होती. कोरोना काळात ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्थलांतरित मजुरांना खिचडी पॅकेट पुरवण्याचे कोट्यवधींचे कंत्राट मिळवले. लॉकडाऊन काळात मुंबईतील स्थलांतरित मजुरांना २५ लाख खिचडी पॅकेट पुरवण्यात आले होते. यात १६० कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला होता. खिचडी पॅकेट पुरवण्याच्या नावाखाली ठाकरे गटाने पालिकेकडून ८ कोटी १० लाख रुपये मिळाले. त्यातील ४ कोटी बोगस कंपन्यांना वळवण्यात आल्याचा दावाही किरीट सोमैया यांनी केला होता. ठाकरे गटाच्या नेत्यांनी बोगस कंपन्या आणि नेत्यांच्या नावावर हा कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला.
चेंबूर येथील निवासस्थानी छापा : सूरज चव्हाण यांची काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून देखील चौकशी करण्यात आली होती. कथित कोव्हिड घोटाळा प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे ईडीकडून चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी छापा देखील टाकण्यात आला होता.
हेही वाचा -
- Suraj Chavan ED Probe : सुरज चव्हाण यांच्याकडून १० कोटींचे चार फ्लॅट खरेदी? घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आज चौकशी सुरू
- Mumbai Covid Contract Scam : मुंबई महानगरपालिका कोविड कंत्राट घोटाळा प्रकरण; ईडीकडून संजीव जयस्वाल यांची सलग 11 तास चौकशी
- video: राज्यातील सत्तांतरामागे भाजपचं, राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण यांचे मत