महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Suraj Chavan ED Probe : सुरज चव्हाण यांच्याकडून १० कोटींचे चार फ्लॅट खरेदी? घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आज चौकशी सुरू

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळातील कोरोना जम्बो सेंटरमधील कथित घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी होत आहे.

Suraj Chavan ED Probe
सुरज चव्हाण ईडी चौकशी

By

Published : Jun 26, 2023, 1:25 PM IST

मुंबई : ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण हे आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी त्यांची ईडी अधिकारी चौकशी करणार आहेत. यापूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्यांनी घोटाळ्याचे आरोप फेटाळले आहेत

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीने 22 जूनला धाड टाकली. सूरज चव्हाण यांच्या चेंबुरमधील निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली. तब्बल 17 तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. के के ग्रँड या चेंबुरमधील इमारतीत 11 व्या मजल्यावर सूरज चव्हाण राहतात. ईडीचे पाच अधिकारी सूरज चव्हाण यांच्या घरी दाखल झाले होते. आज ईडी कार्यालयात सुरज चव्हाण चौकशीसाठी दाखल झाले आहेत. त्यांचा जबाब नोंदवणार असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे.



मुंबईत 15हून अधिक ठिकाणी छापे- कोविड सेंटर कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने सुरज चव्हाण यांना समन्स बजावले होते. त्यानुसार सोमवारी म्हणजेच आहे चौकशीला ईडी कार्यालयात हजर राहिले आहेत. सुरज चव्हाण यांनी 10 कोटींचे चार फ्लॅट खरेदी केल्याचा तपास संस्थेला संशय आहे. कोव्हिड सेंटर घोटाळाप्रकरणी आज होणार चौकशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ईडीने बुधवारी कारवाई करत संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सूरज चव्हाण यांच्या घर तसेच कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. सनदी अधिकारी संजीव जैयस्वाल, महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरीदेखील ईडीचे पथक दाखल झाले होते. या धाडसत्रामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


कोणत्या प्रकरणाची होणार चौकशी?ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून काही सब टेंडर देण्यात आले. ज्यामध्ये वैद्यकीय साहित्य आणि सेवा पुरवण्याचे सब टेंडर होते, या टेंडरशी संबंध सुरज चव्हाण यांचा येतो. त्यामुळे या संपूर्ण कंत्राटामध्ये आर्थिक व्यवहार होताना नियमांची उल्लंघन झाले का? यामध्ये कुठल्या प्रकारचा गैरव्यवहार करण्यात आला का? या सगळ्यांची सखोल चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा-

  1. ED Probe Sangli : तब्बल 53 तासानंतर 'त्या' खात्यांची ईडीकडून चौकशी पूर्ण, ईडीच्या रडारवर कोण ?
  2. ED raids in Mumbai: मुंबईत ईडीची सलग १७ तास छापेमारी, ठाकरे निकटवर्तींयासह आयएएस अधिकारी, बीएमसी अधिकारी लागणार गळाला?
  3. ED Raid in Mumbai : कोव्हिड सेंटरमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणात ईडीची दोन दिवस कारवाई, आतापर्यंत काय घडले?

ABOUT THE AUTHOR

...view details