मुंबई : ट्रक आणि इको कारचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, ९ जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये ४ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहेत. या अपघातात ४ वर्षाचं लहान मुल बचावले आहे. त्याच्यावर माणगाव येथीस सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटे पाचच्या सुमारास ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो विरुद्ध दिशेला जावून समोरून येणाऱ्या इको कारला धडकला.अपघातामुळे महार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच, अपघात झालेली कार बाजूला करण्यात आली आहे.
धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज :घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई, गोवा महामार्गावर गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत रोपीली गावाजवळ हा अपघात झाला आहे. चारचाकीमधून प्रवासी मुंबईवरून खेडला जात होती. याचदरम्यान ट्रक आणि आणि या चारचाकीची धडक झाली. ट्रक आणि चारचाकीचा हा अपघात झाला. या अपघातामधून एक चार वर्षांची चिमुकली वाचली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमीक अंदाज वर्तवला जात आहे.
महामार्गाचे बांधकाम संथ गतीने सुरू: मुंबई-गोवा महामार्गाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. यासोबतच या रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत. गेल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथेही अपघात झाला होता. त्यानंतर लांजा येथे अपघात झाला. या दोन्ही अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात शनिवारी दुचाकीस्वार एका २५ वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. या आधीही 13 जानेवारीला नाशिक महामार्गावरील पाथरे जवळील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ खाजगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला होता. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला होता. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी झाले होते. तर शिर्डीजवळ ट्रक व बसचा भीषण अपघात दहा साईभक्तांचा मृत्यू मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली. या आधीही आठ जानेवारीला पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस स्टेशन परिसरात कार, ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला होता. यात चार जण गंभीर जखमी झाले होते. पालघर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात नवजात बालकासह तिघांचा मृत्यू झाला होता. पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका ट्रकने मागून कारला धडक दिली होती. या अपघातात चार जण जखमी झाले होते.
हेही वाचा : Truck Bus Accident शिर्डीजवळ ट्रक व बसचा भीषण अपघात दहा साईभक्तांचा मृत्यू मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर