मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीत जीलेटीनच्या कांड्या मिळून आल्या होत्या. यासंदर्भातील तपास मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच आणि राज्य एटीएस पथकाकडे देण्यात आला आहे. याकरिता मुंबई पोलिसांकडून 10 तापस पथक बनवण्यात आले असून प्रत्येक पथकाला वेगवेगळी कामं वाटून देण्यात आली आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी १० पथके -
या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून 10 तापस पथक बनवण्यात आले आहेत. प्रत्येक पथकाला वेगवेगळी कामे वाटून देण्यात आलेली आहे. पोलीस खात्यातील सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या पथकाकडे पेडर रोडच्या परिसरात असलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेज एकत्रित करण्याचे काम देण्यात आलेल आहे. यामध्ये पेडर रोड परिसरात असलेल्या सर्व हाउसिंग सोसायटी यांचेही सीसीटीव्ही फुटेज या पथकाकडून गोळा केले जात आहेत. तर दुसऱ्या तपास पथकाकडे मुंबई ट्राफिक पोलिसांच्या मुख्यालयातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मुंबईत दाखल झालेली ही स्कॉर्पिओ गाडी कुठे आणि कशा प्रकारे फिरली याचा पूर्ण तपास करण्याची जबाबदारी या पथकाकडे देण्यात आली आहे. तिसऱ्या पथकाकडून मुंबई पोलिसांचा मुख्यालय व क्रॉफर्ड मार्केट परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम देण्यात आलेला आहे. चौथ्या टीमकडे त्याच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या संशयित लोकांची माहिती गोळा करण्याचे काम देण्यात आलेले आहे. तसेच पाचव्या तपास पथकाकडे फॉरेन्सिकच्या पथकासोबत मिळून काम करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच संशयित व्यक्तींच्या संदर्भात पुरावे गोळा करण्याचे काम यांच्याकडे देण्यात आले आहे.