मुंबई :महाराष्ट्रातील आतापर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षा मंडळ स्थापनेपासून या परीक्षेमध्ये प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षा घालण्यात पूर्वी दहा मिनिटे आधी दिले जात होते. त्यामुळे परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वीचे हे दहा मिनिटे विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेसाठीचे नियोजन करण्यास सुलभ होत होते. प्रश्नपत्रिका निरीक्षण, आकलन आणि मग नियोजन त्यामुळे करता येत होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या आधी जर प्रश्नपत्रिका वाटप केली. तर तेवढ्या दहा मिनिटांच्या कालावधीत त्या प्रश्नपत्रिका फुटत असे. परीक्षेबाहेरच्या वर्तुळामध्ये ती जात असे, त्याच्यावर उत्तरे लिहून कॉपी करण्याचा प्रकार सर्रास महाराष्ट्रामध्ये होत असे, याला आळा घालण्यासाठी शासनाच्या सूचनानुसार परीक्षा मंडळाने परीक्षेच्या आधी दहा मिनिटे देण्याचे निर्णय रद्द केला.
विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पा : वास्तविक इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्यामध्ये पालक व समाज घटक मुख्याध्यापक शिक्षक यांचे सगळ्यांचे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर व तसेच अन्य समाज माध्यमांतून प्रसारित केल्या जायच्या. त्यामध्ये अफवा असायच्या. या घटना शासनाच्या लक्षात आल्या, त्यामुळे शासनाने काही कठोर पावले उचलण्याचे निर्णय घेतले.
कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत परीक्षा : या प्रकारच्या कॉपी करण्याच्या घटनांना प्रतिबंध व्हावा, म्हणून परीक्षा निकोप व्हायला पाहिजे. त्यात भीती नसावी आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत परीक्षा पार पडावी. यासाठी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी मार्च 2023 पासून रद्द करण्यात असल्याचे परीक्षा मंडळाने कळवले होते. मात्र राज्यातील तमाम विद्यार्थी पालक आणि शिक्षक मुख्याध्यापक सर्वांनी विद्यार्थ्यांना दहा मिनिटे सदरची वाढून देण्यात यावी किंवा सुरुवातीला दहा मिनिटे वाढून दिले जावे; अशी मागणी एकमुखाने केली होती. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने सुरुवातीऐवजी नंतरच्या शेवटच्या काळातील दहा मिनिटे वाढवून दिलेली आहेत.