मुंबई- कोरोना विरुद्ध लढ्यात सैनिकप्रमाणे लढणाऱ्या आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांसाठी पंचतारांकित हॉटेलचे दरवाजे ताज समूहाने खूले केले आहेत.कोरोना चा इलाज करणाऱ्या परिचारिका व डॉक्टर ह्यांना ताज हॉटेल्स मध्ये विशेष सुविधा करण्यात आली आहे.
कोरोना विरुद्ध लढा देणाऱ्या परीचारिका व डॉक्टरांसाठी मुंबईतील ताजमहाल पॅलेस, ताज, ताज लँड्स एंड, ताज सांताक्रूझ, या हॉटेल्समध्ये विशेष सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
Coronaupdate: टाटा समूहाने कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांसाठी ताज हॉटेल्स केले खुले आम्ही वैद्यकीय समुदायाच्या योगदानाचा मनापासून कदर करतो. कोरोनावर मात करण्यासाठी स्थानिक अधिकारी तसेच त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्या बरोबर ताजसमुह काम करत राहील, अशा भावना ताज समूहाच्या प्रवक्त्यानी ट्विट द्वारा व्यक्त केल्या आहेत.
Coronaupdate: टाटा समूहाने कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांसाठी ताज हॉटेल्स केले खुले टाटा समूहाने कोरोना विषाणू संकटाचा सामना करण्यासाठी 1,500 कोटी देण्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. संकटाच्या काळात टाटा समूहाचा हा उपक्रम नव्या पिढीसमोर आदर्श ठेवणारा आहे आणि समाजात अशा उपक्रमाची तातडीने गरज आहे जेणेकरून कोरोना विरुद्ध ची लढाई भारत जिंकू शकेल.