मुंबई -सरकारने अनलॉक सुरू केलं. हळूहळू थांबलेली यंत्रणा पुन्हा रुळावर येऊ लागली आहे. बाजारपेठांमध्ये लोकांची गर्दी होऊ लागली आहे. बसमध्ये गर्दी दिसू लागली. हीच गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण तर देणार नाही ना? याची आता भीती वाटू लागली आहे. या वाढणाऱ्या गर्दी विषयी आणि तिसऱ्या लाटे विषयी टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर सुभाष साळुंखे यांचे मत जाणून घेतले. त्यांनी केलेलं भाकीत हे चिंता व्यक्त करणार आहे.
...तर दीड आठवड्यात वाढू शकते रुग्ण संख्या - डॉ. साळुंखे - Maharashtra corona news
गर्दीवर नियंत्रण आणणं गरजेचे आहे. जर या गर्दीवर नियंत्रण आलं नाही, तर दीड ते दोन आठवड्यात पुन्हा संख्या वाढू शकते, असं डॉक्टर साळुंखे यांनी व्यक्त केला आहे.
...तर तिसरी लाट येऊ शकते
डॉक्टर साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना आजार संसर्गजन्य आहे आणि होणारी गर्दी हा आजार पसरवू शकते. सरकारनं अनलॉक केल्यानंतर लोक गर्दी करू लागले आहेत. लग्न, समारंभ किंवा मेळावे इथं गर्दी होताना दिसते. बाजारपेठा, दळणवळणाच्या सोयी सुविधा इथं गर्दी होताना दिसते आहे. ही गर्दी कोरुना प्रादुर्भाव पसरवण्यासाठी पुरेशी आहे. कोरोनाचा विषाणू म्युटेट होणार आहे. या विषाणूमध्ये झालेला बदल चिंता वाढवणारा आहे. बदललेला विषाणू पहिल्या विषाणूपेक्षा अधिक क्षमतेने रोगाचा प्रसार करतो. त्यामुळे अशी गर्दी होत राहिल्यास तिसरी लाट येऊ शकते, असं भाकित डॉ. साळुंखे यांनी व्यक्त केला आहे.
दीड ते आठवड्यात वाढू शकते कोरोना रुग्णांची संख्या
दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या सातत्यानं वाढत होती. मात्र लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मात्र अनलॉकमुळं लोक अनेक ठिकाणी लोक गर्दी करत आहेत. या गर्दीवर नियंत्रण आणणं गरजेचे आहे. जर या गर्दीवर नियंत्रण आलं नाही, तर दीड ते दोन आठवड्यात पुन्हा संख्या वाढू शकते, असं डॉक्टर साळुंखे यांनी व्यक्त केला आहे.
60 ते 70 टक्के लसीकरण गरजेचं
लसीकरण हे कोरोना विरोधात लढण्याचं मुख्य अस्त्र आहे. भारतात कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन लस दिल्या जात आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 2 कोटी 46 लाख 81 हजार 465 लाभार्थ्यांचे लसीकरण झाला आहे. मात्र हे लसीकरण पुरेसं नाही. राज्यात साधारण सत्तर टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. लसीकरणानंतर जनतेमध्ये कोरोना विरोधात लढण्याची क्षमता निर्माण होईल. ते फायद्याचं असेल. त्यामुळे अजून पुरेसं लसीकरण झालेलं नाही. लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. असे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. दरम्यान कोरोनाचा काळ भयंकर आहे. पहिली लाट आली. नवा रोग असल्याने उपचार पद्धती माहित नव्हत्या. अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागले. त्यानंतर दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला. रुग्णांना बेडच्या कमतरता जाणवू लागल्या. ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अनेकांचे प्राण गेले. रेमडेसिवीर सारख्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला. त्यातच म्यूकरमायकोसिस आजारानं डोकं वर काढलं. उपचारांसाठी लाखोंचा खर्च सर्वसामान्यांना परवडेना. सरकारनं कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा अंतिम पर्याय निवडला. परिणामी रुग्ण संख्या कमी होऊ लागली. दुसरी लाट ओसरु लागली किंबहुना ती आटोक्यात येऊ लागली. आता अनलॉक सुरू करण्यात येत आहे. नागरिक अनेक ठिकाणी गर्दी करताना दिसून येत आहेत. यामुळे पुन्हा रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.