महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Honeytrap News : हनीट्रॅपपासून वाचायचे का? सोशल मीडियावर बाळगा अशी सावधगिरी - Avoid Honeytraps

डीआरडीओ या संवेदनशील कार्यालयात काम करणाऱ्या प्रदीप कुरुलकर या शास्त्रज्ञाने पाकिस्तानी महिलेच्या हनीट्रॅपमध्ये अडकून भारताविषयी अतिसंवेदनशील माहिती दिली. या संशयाने महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पुण्यातून अटक केली आहे. तर अशा सायबर गुन्ह्यांत फसू नये यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत सायबर एक्सपर्ट रितेश भाटिया यांनी माहिती दिली.

Honeytrap News
सोशल मीडियावर अशी बाळगा सावधगिरी

By

Published : May 5, 2023, 10:26 PM IST

माहिती देताना सायबर एक्सपर्ट

मुंबई : पुण्यातील डीआरडीओच्या कार्यालयात संचालक पदावर कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना एटीएसने बेड्या ठोकल्या आहेत. पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या हस्तक असलेल्या महिलेशी सोशल मीडियाच्या व्हाट्सअपद्वारे व्हॉइस कॉलच्या माध्यमातून शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे संपर्कात होते असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली. भारताची अति संवेदनशील माहिती शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या हस्तकाला पुरवल्याचा संशय एटीएसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकल्याने शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे अडचणीत आले आहेत.

पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा संशय : 2018 मध्ये सुद्धा नागपूरचा रहिवासी असलेला शास्त्रज्ञ अगरवाल हा देखील हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. अगरवाल याने हनी ट्रॅपमध्ये अडकून इस्रोच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय होता. त्यामुळेच त्याला अटक करण्यात आली होती. अशा प्रकारे अनेक बड्या हुद्द्यावर असणाऱ्या व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकत आहेत. तेव्हा सोशल मीडियाचा वापर करताना अशा प्रकारच्या हनी ट्रॅप मध्ये किंवा सेक्सटॉर्शन, रोमांस स्कॅम तसेच सायबर गुन्ह्यांत फसू नये यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत सायबर एक्सपर्ट रितेश भाटिया यांनी माहिती दिली आहे.

हनी ट्रॅपच्या जाळ्यात सहज अडकले जातो: सायबर एक्स्पोर्ट रितेश भाटिया यांनी सांगितले की, जेव्हा आपण सायबर केस बद्दल बोलतो तेव्हा विश्वास ट्रस्ट हा एक भ्रम आहे. ट्रस्ट हा एक भास असतो. कारण आपण जेव्हा विश्वास ठेवायला जातो तेव्हा सेक्सटॉर्शन, रोमान्स स्कॅम आणि हनी ट्रॅपच्या जाळ्यात सहज अडकले जातो. अशा प्रकारच्या केसेस अलीकडच्या काळात वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला आपले सोशल मीडियावरील प्रोफाइल अथवा अकाउंट प्रायव्हेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच आपल्याला कोण फॉलो करत आहे. त्याबाबत देखील थोडीफार जानकारी असणे आवश्यक आहे. पण ज्या व्यक्तीबरोबर चॅट करत आहोत तर त्यावेळी खूप सतर्क राहणे गरजेचे आहे. गोड गोड बोलून तुमच्याकडून पैसा उकळू शकतात किंवा महत्त्वाची माहिती काढून घेऊ शकतात, असे रितेश भाटिया यांनी सांगितले.



तुम्ही हनी ट्रॅपमध्ये अडकू शकता: त्याच प्रकारे चॅट करणाऱ्या समोरच्या व्यक्तीने तुमचे आज घेतले फोटो मागितले. किंवा तुम्हाला थोड्या वेळासाठी व्हिडिओ कॉलवर येण्यास सांगितले जाईल, तेव्हाच तुमच्यासाठी हा रेड फ्लॅग असेल. त्यावेळी तुम्ही सतर्क रहा आणि त्या व्यक्तीशी संपर्क तोडून टाका. अशाप्रकारचे संभाषण बंद करून टाका. अशा प्रकारे तुम्ही हनी ट्रॅपमध्ये अडकू शकता. गोड बोलून तुम्हाला समोरची व्यक्ती तुमच्या खाजगी माहिती फोटो देता आणि मग त्यानंतरच तुम्हाला ब्लॅकमेल करणे सुरू केले जाते. त्यावेळी एखादी अज्ञात व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करून तुमच्याशी गोड गोड बोलत असेल, प्रमाणे तुमचे खाजगीतले फोटो व्हिडिओ मागत असेल आणि व्हिडिओ कॉलवर येण्यास सांगत असेल तर त्यावेळेस तिथे सतर्क व्हा, असे आवाहन सायबर एक्सपर्ट रितेश भाटिया यांनी केले आहे.

हेही वाचा: The story behind arrest Kurulkar कुरुलकर यांच्या अटकेमागची कहाणी

ABOUT THE AUTHOR

...view details