महाराष्ट्र

maharashtra

मनसेच्या दणक्यानंतर 'टी सिरीज' कंपनीने पाकिस्तानी गायक अतिफ अस्लमचे गाणे हटवले

By

Published : Jun 24, 2020, 5:01 PM IST

मनसेचे नेते अमेय खोपकर यांच्या इशाऱ्यांनातर टी सीरिजने पाकिस्तानी गायकाचे गाणे यु ट्यूब चॅनलवरून हटवले आहे. त्यांनी याबाबत राज ठाकरेंना पत्र लिहिले आहे.

t series delete song of pakistani singer after mns warning
टी सीरिजने राज ठाकरे यांना पत्र लिहून पाकिस्तानी गायकाच्या गाण्याबद्दल केलेला खुलासा

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर टी सीरिजला पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम यांचे गाणे काढून टाकायला सांगितले होते. त्यांनी याबाबत ट्विट करून इशारा दिला होता. यानंतर टी सीरिज कंपनीने माघार घेतली आहे. टी सिरीज कंपनीने हे गाणं आपल्या यु-ट्यूब चॅनलवरून काढून टाकले आहे.

मनसेच्या दणक्यानंतर टी सीरिजची माघार

सूपर कॅसेट्स कंपनी म्हणजेच टी सीरिजने आज जाहीर केलेल्या पत्रकात पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम याने गायलेले 'इन्ना सोना' हे गाणे काढून टाकत असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानी गायकांकडून गाणी गाऊन घेणे आणि त्यांना काम देणे याला कंपनीचाही विरोध असून ही बाब एका कर्मचाऱ्याला ठाऊक नसल्याने त्याच्या हातून ही चूक झाली असल्याचे स्पष्टीकरण कंपनीच्या वतीने देण्यात आले आहे. मात्र, झालेल्या चुकीबद्दल माफी मागतानाच अशी चूक पुन्हा होणार नसल्याची ग्वाही कंपनीने दिलेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून लिहिण्यात आलेल्या पत्रकात कंपनीने ही बाजू मांडली आहे.

टी सीरिजने राज ठाकरे यांना पत्र लिहून पाकिस्तानी गायकाच्या गाण्याबद्दल केलेला खुलासा

टी-सीरिज म्युजिक कंपनी गेले काही दिवस चर्चेत आहे. गायक सोनू निगम याने कंपनीचे मालक भूषण कुमार यांच्यावर आरोप केले होते. सोनुने आपल्या सोशल मीडियावर अपलोड केेलेल्या व्हिडिओमध्ये भूषण कुुमार यांच्यावर नवोदित गायकांना संधी देत नसल्याचा आरोप केला होता. मात्र, त्या आरोपांची राळ खाली बसत नाही तोच पाकिस्तानी गायकाची गाणे अपलोड केल्याच प्रकरण समोर आले होते.

यापूर्वी देखील बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने आपल्या रईस या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्री माहीरा खान हिला घेतल्याने मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर शाहरुखने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन हुतात्मा सैनिकांच्या विधवांना 5 कोटी रुपये देण्याच मंजूर केल्यानंतर मनसैनिकांनी हा सिनेमा रिलीज होऊ दिला होता. त्यामुळे मनसेच्या विरोधाची धार किती तीव्र असू शकते, याची पूर्वकल्पना असल्याने टी सीरिज कंपनीने या प्रकरणी शरणागती पत्करलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details