मुंबई- आई या शब्दाची फोड करताना आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर अशीच केली पाहिजे. आई आपल्या मुलांना घडवते स्वतः उन्हात राहून मुलांना सावली देते. जशी आई मुलांच्या स्वच्छतेची काळजी घेते, तसेच मुंबईला स्वच्छ ठेवून कोरोनाविरोधातील लढ्यात सहभाग घेणाऱ्या या आईचा मोलाचा वाटा आहे.
कोरोना योद्धा, जिवाची पर्वा न करता 'या' महिला करताहेत सफाईचे काम स्वतः घरी आईची जबाबदीर पार पाडत मुंबईकरांच्या स्वच्छतेसाठी रोज सकाळी रस्त्यावर आपली जबाबदारीही अगदी नित्यनियमाने ही आई बजावते. मागील 20 वर्षांपासून मुंबईच्या आरोग्यासाठी व स्वतःच्या मुलांचा उज्ज्वल भविष्यासाठी रोज न चुकता ही आई आपल्या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत आहे.
सध्या कोरोनाने संपूर्ण जगाभरात धुमाकुळ घातला आहे. पण, कोरोना विरुद्धच्या लढ्यात पहिल्या फळीतील सैनिक बनून ती लढत आहे . मुंबईत 28 हजार 18 सफाई कामगार आहेत. जे मुंबई स्वच्छ व सुंदर दिसावी म्हणून कोणतीही भीती न बाळगता कचरा उचलतात. मुंबईत यांसारख्या अनेक माता सकाळ व दुपार, अशा दोन शीफ्टमध्ये काम करून मुंबईला आपल्या बाळाप्रमाणे सांभाळतात. प्रत्येक सफाई कामगारांना 500 मीटर रस्ता व्यवस्थापित करावा लागतो. दोन सफाई कामगारांना 1 किमीचा रस्त्यावरील सफाई करावी लागते. मग कोरोना असो, मुंबईचा पाऊस असो कि ऊन ही आई आपली जबाबदारी विसरत नाही. मुंबईत स्वच्छतेचे काम करुन रोगराईचा फैलाव होण्यापासून बचाव करते, अशा तमाम मातांना सलाम.
हेही वाचा -'परराज्यात जाण्यासाठी रिक्षा, टॅक्सी चालकांना ऑफलाईन परवानगी द्या'