महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरे २८ नोव्हेंबरला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, ३ डिसेंबरला सिद्ध कराव लागणार बहुमत - आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे संवाद न्यूज

राज्यपालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही आता यापुढे जास्त बोलणार नसून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray

By

Published : Nov 27, 2019, 12:26 AM IST

Updated : Nov 27, 2019, 5:47 AM IST

मुंबई - अनेक राजकीय घडामोडीनंतर राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकासआघाडीचे सरकार येणार, हे निश्चित झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २८ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ शिवतिर्थावर घेतील. महाविकासआघाडीला ३ डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

हेही वाचा - 'मातोश्री' ते 'वर्षा' ; ठाकरेंचा किंगमेकर ते किंगपर्यंतचा प्रवास

राज्यपालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही आता यापुढे जास्त बोलणार नसून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. पुढील पाच वर्षात नव्या दिशेसह नवा महाराष्ट्र घडवणार असल्याचा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. खातेवाटपाबाबत सर्व नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

हेही वाचा - #FadanvisResigns: आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप करणाऱ्यांनी स्वत: तबेला खरेदी केला, फडणवीसांचे टीकास्त्र

अडिच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या शिवसेनेच्या मागणीनंतर भाजप-सेना युतीमध्ये नितुष्ट निर्माण झाले होते. तर असा कुठलाही फॉर्म्युला ठरला नसल्याचे सांगत भाजपने सेनेची मागणी फेटाळून लावली होती. अखेर याच मुद्दयावर भाजप-सेनेची युती तुटली. युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली. यातूनच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकासआघाडी उदयाला आली.

Last Updated : Nov 27, 2019, 5:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details