महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sushma Andhare On Elvish Yadav: एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरतीसाठी कसा पोहोचला? सुषमा अंधारे यांचा सवाल

Sushma Andhare On Elvish Yadav: रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी युट्युबर एल्विश यादवसह (Drug smuggler Elvish Yadav) सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. एल्विश यादववर विषारी सापांची तस्करी आणि रेव्ह पार्ट्या आयोजित केल्याचा आरोप आहे. गणपतीच्या दिवसात हाच युट्युबर यादव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी गणपतीच्या आरतीसाठी उपस्थित होता. त्याने मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी गणपतीची आरती देखील केली. एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता रेल्वेशी यादव युतीवरचे फोटो केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत व्हायरल झाले आहेत, असा आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे.

Sushma Andhare On Elvish Yadav
सुषमा अंधारे यांची टीका

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 10:51 PM IST

मुंबईSushma Andhare On Elvish Yadav: ललित पाटील ड्रग प्रकरणानंतर महाराष्ट्र सोबतच केंद्र सरकार देखील ठाकरे गटाच्या सध्या निशाणावर आहे. महाराष्ट्रातील वाढत्या ड्रग वापराबाबत ठाकरे गटाने संजय राऊत यांच्यासह इतर नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर आता युट्युबर एल्विश यादव प्रकरण पुढे आल्याने ठाकरे चांगलाच आक्रमक झाला आहेत. केंद्र सरकार सोबतच राज्य सरकारवर टीका केली जात आहे. याबाबत उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्या म्हणाल्या की, हा एल्विश यादव. (Elvish Yadav On Bungalow Varsha) याच्यावर ड्रजशी संबंधित अनेक गुन्हे दाखल आहेत. विषारी सापांपासून ड्रग्स बनवून ते रेव्ह पार्ट्यांना पुरवण्याचे आरोप एल्विशवर आहेत. राज्यामध्ये ठीक ठिकाणी ड्रग्सचे साठे, कारखाने आढळत आहेत. त्यात आमचा काही सहभागच नाही किंवा आमचा संबंधच नाही. अशा मखलाशा सरकारकडून रोज केल्या जात आहेत. मग प्रश्न असा निर्माण होतो की हा एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरतीसाठी कसा बरे पोचला असेल?

देशात जो अंमली पदार्थाचा व्यापार:या प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली. संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, त्या यादवला एक खासदार मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातो. त्यांना मिठ्या मारल्या जातात आणि त्याच्या हातून गणपतीची आरती देखील केली जाते. मुख्यमंत्री त्याच्या बाजूला उभे राहतात. देशात जो खतरनाक अंमली पदार्थाचा व्यापार चाललाय त्याची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? याचा शोध घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत याला कोणी पोहोचविले? मुख्यमंत्र्यांच्या टोळीतील हे खासदार कोण आहेत? त्याचे काय आर्थिक संबंध आहेत? मुख्यमंत्र्यांच्या टोळीत कोणाशी आहेत? याचे उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांना द्यावं लागतील." असा गंभीर सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा:

  1. Elvish Yadav : एल्विश यादवचं महाराष्ट्र कनेक्शन; कोटा पोलिसांनी पकडलं, चौकशी केली अन्
  2. What is a rave party : ड्रग तस्करीत फसला एल्विश यादव, काय असते रेव्ह पार्टी आणि कसं सुरू झालं रेव्ह कल्चर?
  3. Elvish Yadav Clarification Video : सापाच्या विषाची तस्करी करत असल्याचा आरोपाचं एल्विश यादवनं केलं खंडन

ABOUT THE AUTHOR

...view details