मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सीबीआयकडे तपास गेल्यावर दिल्लीतून सीबीआयचे तपास पथक हे मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासाची कागपत्र व पुरावे घेतल्यानंतर तपासाअंती सुशांतसिंहचा स्वयंपाकी नीरज याला सीबीआय कार्यालयात आणण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : सुशांतचा स्वयंपाकी नीरजची सीबीआय चौकशी सुरू
सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सीबीआयकडे तपास गेल्यावर दिल्लीतून सीबीआयचे तपास पथक हे मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासाची कागपत्र व पुरावे घेतल्यानंतर तपासाअंती सुशांतसिंहचा स्वयंपाकी नीरज याला सीबीआय कार्यालयात आणण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण - सुशांतचा स्वयंपाकी नीरजची सीबीआय चौकशी सुरू
दरम्यान, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला सीबीआयकडून सरावात झाली असून टप्प्याटप्याने या प्रकरणाशी संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे. सध्या तपासाअंती सुशांतसिंहचा स्वयंपाकी नीरज याची चौकशी करण्यात येत असून पुढच्या टप्प्यात रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतसिंहचा मित्र महेश शेट्टी, सिद्धार्थ पिठानी या सगळ्यांची चौकशी सीबीआयकडून केली जाणार आहे.