महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या संशयास्पद नाही; पोलीस सूत्रांची माहिती - सुशांत सिंग राजपूत आत्महत्या

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली. सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. मात्र, सुशांतची आत्महत्या संशयास्पद नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

सुशांत सिंह राजपूत
सुशांत सिंह राजपूत

By

Published : Jun 14, 2020, 7:39 PM IST

Updated : Jun 14, 2020, 8:03 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुत याने रविवारी मुंबईतील बांद्रा पालिहिल येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर या संदर्भात पोलीस चौकशी करत आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या प्राथमिक तपासात या प्रकरणात संशयास्पद अद्याप काहीही आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

रविवारी सकाळी साडेसहा वाजता सुशांत हा झोपेतून उठला होता. सकाळी साडेनऊ वाजता सुशांत सिंह याने त्याच्या घरी काम करणाऱ्या स्वयंपाक्याकडून डाळिंबाचा जूस बनवून पिण्यासाठी घेतला होता. त्यावेळी सुशांत सिंह यांच्या सोबत क्रिएटीव मॅनेजर, स्वयंपाकी आणि घरगडी होते. सकाळी दहा वाजता सुशांत हा त्याच्या बेडरूममध्ये गेला व त्याने दरवाजा आतून बंद केला होता. सकाळी साडेदहा वाजता सुशांतचा स्वयंपाकी त्याला जेवण काय बनवायचे, हे विचारण्यासाठी गेला होता. त्यावेळी बेडरूम आतून लॉक असल्याचे त्याच्या लक्षात आले. सुशांतच्या क्रिएटीव्ह मॅनेजरने काही वेळाने पुन्हा त्याला आवाज दिला. मात्र, त्याने उत्तर न दिल्याने त्याने त्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुशांतने फोनलाही उत्तर न दिल्याने क्रिएटीव्ह मॅनेजरने सुशांतच्या बहिणीला फोन करून याबद्दल माहिती दिली. दुपारी साडेबाराच्या दरम्यान सुशांतची बहीण त्याच्या घरी आल्यावर त्यांनी चावी बनविणाऱ्याला बोलावून दरवाजा उघडला. त्यावेळी सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकत असलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांच्या मते सकाळी 10 ते 1 च्या दरम्यान सुशांतने आत्महत्या केली असावी.

सुशांतचा मृतदेह घरातील तीन जणांनी खाली उतरवून बेड वर ठेवला. दुपारी साधारणपणे 2.30 वाजता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. सुशांतच्या घरातून पोलिसांना काही मेडिकल रिपोर्ट मिळाले आहेत. त्यात सुशांत सिंग हायपर टेंशन व सिविअर डिप्रेशनने ग्रासलेला होता, असे नमूद आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुशांत गेल्या काही दिवसांपासून कुठलेही औषध घेत नव्हता. दरम्यान, पोलीस सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची वाट बघत आहेत.

Last Updated : Jun 14, 2020, 8:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details