मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा दिनांक २३ ऑगस्टपासून संवाद दौरा सुरू होत आहे. या संवाद दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.
खासदार सुप्रिया सुळे २३ ऑगस्टपासून 'संवाद' दौऱ्यावर; पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यांचा समावेश - sanvad daura
राज्यातील पूरपरिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि एकूणच ढिसाळ प्रशासकीय कारभार आणि सामान्यांप्रती सरकारी अनास्था या पार्श्वभूमीवर संवाद साधण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
खासदार सुप्रिया सुळे
राज्यातील पूरपरिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि एकूणच ढिसाळ प्रशासकीय कारभार आणि सामान्यांप्रती सरकारी अनास्था या पार्श्वभूमीवर संवाद साधण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. संवाद दौर्याचा पहिला टप्पा दिनांक २३ ते ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या टप्प्यात अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर आणि नवी मुंबई या जिल्ह्यांमध्ये संवाद साधणार आहेत.